Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे, दि. १६ :- कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर कुटुंबातील अन्य सदस्य अथवा जवळचे नातेवाईक येईपर्यंत तसेच रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करणे स्थगित केले जाते. अशा वेळेला मृतदेह शवागारात ठेवण्याऐवजी घरीच फ्रिझर असलेल्या शवपेटीत ठेवता येणार आहे. तशी शवपेटी आरोग्य मित्र फाउंडेशन व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट ह्यांच्या मदतीने उपलब्ध करण्यात आली आहे. ही शवपेटी माफक दरात उपलब्ध असणार आहे. शवपेटी ठराविक कालावधीसाठी घरी नेता येणार आहे. त्यामुळे प्रियजन येईपर्यंत मृतदेह शवागारात ठेवण्याची गरज नाही. नुकतेच या शवपेटीचे लोकार्पण ऑगस्ट महिन्यात करण्यात आले.
Thank you for reading this post, don’t forget to subscribe!
पिंपरी-चिंचवड शहरात सध्या शहरात यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात आणि निरामय हॉस्पिटल या दोनच ठिकाणी तसेच पुण्यात पण फार थोड्या ठिकाणी शवागार आहेत. पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील नागरिकांना आपल्या कुटुंबातील अथवा नातेवाईकांचे निधन झाल्यास अंत्यसंसकारासाठी खूप विलंब असेल तर या ठराविक ठिकाणी नेऊन मृतदेह ठेवावा लागतो.
आरोग्य मित्र फाउंडेशन व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट ह्यांच्या मदतीने बनविण्यात आलेल्या या शवपेटीत मृत शरीर ठेवल्यास त्याचे विघटन म्हणजेच कुजण्यापासून वाचवता येते. या पेटीला चाके असल्याने त्याचे सहजपणे कुठेही स्थलांतर करता येते. घरगुती 230 वॉल्ट विजेवर यातील फ्रीझर चालू शकतो. ही सुविधा माफक दरात उपलब्ध असून याचा नागरिकांनी उपयोग करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शवपेटी वापरताना खालील काळजी घेणे आवश्यक आहे
- मृत शरीर 24 तासापेक्षा जास्त वेळ ठेवता येणार नाही.
- जर विद्युत प्रवाह घरी खंडित झाला तर वरील कव्हर काढून ठेवावा.
- मृत शरीर ठेवायच्या अगोदर तासभर विद्युत प्रवाह चालू करून ४ डिग्री तापमान आल्यानंतर वापरता येईल.
- उचलताना,जिन्यातून वर नेताना शवपेटी 30 अंशापेक्षा तिरकी करू नये
- बॉक्स स्वत:च्या जबाबदारीवर न्यायचा आहे. शवपेटी माफक दरात उपलब्ध असून त्याची वाहतूक करण्यासाठी रुग्णवाहिकेचा खर्च करावा लागेल.
- बॉक्स नेताना मृत्यू प्रमाणपत्र व नेणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड प्रत द्यावी लागेल.
- हाताळताना शवपेटी नादुरुस्त झाली तर त्याचा दुरुस्तीचा खर्च द्यावा लागेल.
सदर शवपेटी लोकांपर्यत पोहचण्याची सोय पिंपरी चिंचवड शहराकरिता कालभैरव उस्तव समिती, चिंचवड संस्था व पुणे शहराकरीता केअर टेकर संस्था यांनी घेतली आहे.
शवपेटी मिळवण्यासाठी संपर्क –
पुणे शहर
श्री मारियो (9372078861), श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट (91122 21892)
पिंपरी-चिंचवड शहर
कालभैरव उत्सव समिती चिंचवडगाव
ओंकार गौरीधर (9372937598), योगेश चिंचवडे (9922562637), सुनील लांडगे (7020485405),
आरोग्य मित्र फाउंडेशन
ऋषिकेश तपशाळकर (9011050005), गणेश जवळकर (8975748799)