Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुणे शहर पोलिस आयुक्तांचा दणका. कोम्बिंग ऑपरेशन

52

पुणे,दि.१७ :- पुणे शहरात वाढत असलेल्या गन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर आणि आलेल्या सनानिमित्ताने पुणे शहर पोलिसांकडून कोम्बींग ऑपरेशन राबवण्यात आले. पुणे शहर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री शहरात विविध ठिकाणी कोबिंग ऑपरेशन करुन गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. पुणे शहर पोलिसांनी हे कोंबींग ऑपरेशन शनिवारी (दि.१६) रात्री १० ते रविवारी (दि.१७) मध्यरात्री पर्यंत या वेळेत केले. शहरातील विविध भागात कारवाई करुन २ हजार ५४४ गुन्हेगारांची झाडाझडती घेऊन ७५७ जणांना अटक केली.
पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करुन गुन्हेगारांना चेकींग करुन प्रतिबंधक कारवाई करणे, हॉटेल, लॉज, ढाबे, एस.टी व बस स्थानके, रेल्वे स्टेशन तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारे संशयीत व्यक्ती, घटना इत्यादींची कसून तपासणी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखे कडून कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी शहरातील वेगवगेळ्या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन व तपासणी करुन कारवाई केली.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

परिमंडळ- १

मध्ये मोहिमे दरम्यान १ आरोपीस अटक करुन त्याचेकडुन १ कोयता जप्त करण्यात आलेला आहे. तसेच दारुबंदीची १ केस करुन १ आरोपींकडुन गावठी हातभट्टी दारुचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.

परिमंडळ – २

मध्ये मोहिमे दरम्यान गुन्हयात पाहिजे असलेला आरोपी १ व गुन्ह्यात निष्पन्न परंतू अटक नसलेले २ आरोपी अटक करण्यात आलेले आहे. २ आरोपीस अटक करुन त्याचेकडुन २ कोयते जप्त करण्यात आलेले आहे. तसेच दारुबंदीची ७ केस करुन ७ आरोपींकडुन गावठी हातभट्टी दारुचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. प्रोव्हिबिशन प्रमाणे १ केस करण्यात आलेली असुन १ आरोपींकडुन मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ चालु असलेल्या २ आस्थापनांवर योग्य ती कारवाई केलेली आहे.

परिमंडळ-३

मध्ये विशेष मोहिमे दरम्यान गुन्ह्यात निष्पन्न परंतू अटक नसलेले २ आरोपी अटक करण्यात आलेले आहे. तसेच दारुबंदीची ५ केस करुन ५ आरोपींकडुन गावठी हातभट्टी दारुचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. प्रोव्हिबिशन प्रमाणे १ केस करण्यात आलेली असुन २ आरोपींकडुन मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ चालु असलेल्या १ आस्थापनांवर योग्य ती कारवाई केलेली आहे. तसेच कोटपाचे ९ खटले दाखल केले आहे.

परिमंडळ-४

मध्ये विशेष मोहिमे दरम्यान गुन्ह्यात निष्पन्न परंतु अटक नसलेले ३ आरोपी अटक करण्यात आलेले आहे. तडीपार आदेशाचा भंग केल्याने १ आरोपीस मपोका १४२ प्रमाणे १ केस करण्यात आलेली आहे. तसेच तसेच दारुबंदीची ५१ केस करुन ११ आरोपींकडुन गावठी हातभट्टी दारुचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. प्रोव्हिबिशन प्रमाणे ५ केस करण्यात आलेली असुन ५ आरोपींकडुन मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ध्वनी प्रदुषण बाबत ३ केस करण्यात आलेल्या आहेत. तसेच कोटपावे ९ खटले दाखल केले आहे. विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ चालु असलेल्या १० आस्थापनांवर योग्य ती कारवाई केलेली आहे.

परिमंडळ-५

मध्ये विशेष मोहिमे दरम्यान ४ आरोपीस अटक करुन त्याचेकडुन ३ कोयता व १ सुरा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच दारुबंदीची १४ केस करून १४ आरोपींकडुन गावठी हातभट्टी दारुचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. तसेच कोटपाचा १ खटला दाखल केला आहे..

गुन्हे शाखेने केलेली कारवाई खालीलप्रमाणे:

युनिट ३
पर्वती १) आदित्य युवराज भालेराव वय १९, रा. महात्मा फले वसाहत, सिहगड रोड, पुणे २) ऋतिक दिलीप कांबळे वय २३ रा. महात्मा फले वसाहत, सिंहगड रोड, पुणे ३) गौरव वामन चव्हाण वय २३ रा. हिंगणे खुर्द, पुणे ४)

अजय राजु दास वय १९, रा. महात्मा फले वसाहत, सिंहगड रोड, पुणे यास अटक करुन पोलीस

स्टेशन ताब्यात दिले. अंमली पदार्थ विरोधी पथक १ लोणी काळभोर पो स्टे येथे एनडीपीएस अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपी नामे अक्षय इरेश शिंदे वय २२, रा. मयुरी कॉलनी, हांडेवाडी रोड, पुणे याचे ताब्यातुन १ किलो २२७ ग्रॅम गांजा रु. २४,५४०/- १ मोबाईल रु. ५,०००/- व १ दुचाकी अॅक्टीवा रु. ८०,०००/- मुद्देमाल जप्त करून आरोपीस पोलीस स्टेशन ताब्यात दिले.

३ आरोपीस अटक करुन त्याचेकडुन २ कोयते रु. १,५००/- व १ लोखंडी सुरा रु. ४००/- चा जप्त करण्यात आलेला आहे. तडीपार आदेशाचा भंग केल्याने २ आरोपीविरुध्द मपोका १४२ प्रमाणे २ केसेस करण्यात आलेल्या आहेत. दारुबंदीच्या ९ केसेस करून ए आरोपींकडुन रु. २७,३५०/- चा दारुचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. तसेच कोटपाचे ११ खटले दाखल केले आहे. विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ चालु असलेल्या ३ आस्थापनांवर योग्य ती कारवाई केली आहे.

सदर विशेष मोहिमे दरम्यान एकुण कारवाईचा आढावा घेतला असता खालीलप्रमाणे कारवाई करण्यात

आलेली आहे.. > विश्रामबाग, शिवाजीनगर, सहकारनगर, उत्तमनगर, सिंहगड रोड, येरवडा, विमानतळ, चंदननगर, कोंढवा व

(d))

बिबवेवाडी या पोलीस स्टेशनने बेलेबल व नॉन बेलेबल वारंट बजावणी उत्कृष्टपणे केलेली आहे. > मुंबई प्रोव्हिबीशन अॅक्ट प्रमाणे एकुण गुन्हे शाखेने ९ केसेस करून ९ आरोपींकडून रोख व गावठी दारू अशा

रु. २७,३५०/- व पोलीस स्टेशनने ३८ केसेस करून ३८ आरोपींकडुन रु. ३७.१०५/- मुद्देमाल जप्त करण्यात

आला आहे. महा जुगार अॅक्ट प्रमाणे पोलीस स्टेशनने एकुण ७ केस करुन आरोपीकडुन रु. ९,४७५/- चा जुगाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील एकूण ५५० हॉटेल, ढाबे व लॉजेस चेक, तसेच १५७ एस टी स्टॅण्ड/ रेल्वे स्थानक/ निर्जन ठिकाणे चेक करण्यात आले आहे.

पोलीस स्टेशनकडुन नाकाबंदी दरम्यान ९६५ संशयित वाहन चालकांना चेक करुन २५७ जणांवर रु. २,२४.२००/- ची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे….

> वाहतुक शाखेकडून १००७ संशयित वाहन चालकांना चेक करुन २६१ जणावर वाहन धारकांवर कारवाई करुन रु. २,२५,८००/- दंड वसुल करण्यात आला आहे.

वरील प्रमाणे मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर. रितेश कुमार यांचे आदेशान्वये. पोलीस सहआयुक्त, पुणे शहर. संदीप कर्णिक. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, रामनाथ पोकळे,अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग. प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, संदीप सिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३, सुहेल शर्मा, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४. शशिकांत बोराटे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -५. विक्रांत देशमुख, पोलीस उप आयुक्त, वाहतुक विभाग, विजयकुमार मगर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा व पोलीस ठाणेकडील अधिकारी / अंमलदार तसेच वाहतुक विभागाकडील अधिकारी अंमलदार यांचे पथकाने संयुक्तपणे उपरोक्त कामगिरी केली आहे. यापुढेही कोम्बींग ऑपरेशन व नाकाबंदी चेकींग राबवुन गुन्हेगारांचे हालचालींवर सक्त नजर ठेवून त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.