Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

१२ हजारांत १२जीबी रॅम! ५० मेगापिक्सल कॅमेऱ्यासह स्वस्त Vivo Y17s लाँच, जाणून घ्या संपूर्ण माहिती

11

विवोनं आपल्या बजेट फ्रेंडली वाय सीरिजचा विस्तार केला आहे. कंपनीचा Vivo Y17s स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच झाला आहे. कंपनीनं हा फोन आपल्या सिंगापूरच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट केला आहे. ह्या लिस्टिंगमधून स्पेसिफिकेशन आणि किंमतची माहिती समोर आली आहे. चला जाणून घेऊया ही माहिती.

Vivo Y17s ची किंमत

Vivo Y17s चा एकमेव मॉडेल ११९ सिंगापूर डॉलर्समध्ये सादर करण्यात आला आहे, ही किंमत १२,१५० भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. डिवाइस ६जीबी रॅम +१२८ जीबी स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. कंपनीनं फोन ग्लिटर पर्पल आणि फॉरेस्ट ग्रीन अशा दोन कलर ऑप्शनमध्ये बाजारात आणला आहे. लवकरच हा फोन भारतीय बाजारात देखील दाखल होऊ शकतो.

हे देखील वाचा: ४जी फोनला देखील मिळणार १.५ जीबीपीएसचा स्पीड; उद्या लाँच होणार Jio AirFiber

Vivo Y17s चे स्पेसिफिकेशन्स

विवोचा नवीन स्मार्टफोन ६.५६ इंचाची एचडी प्लस स्क्रीन देण्यात आली आहे, जी १६१२ × ७२० पिक्सल रेजोल्यूशन, ६० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २६९पीपीआयला सपोर्ट करते. हा मोबाइल अँड्रॉइड १३ आधारित फन टच ओएस १३ वर चालतो. फोनमध्ये आयपी ५४ रेटिंग, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम ४जी, वाय-फाय, ब्लूटूथ सारखे फीचर्स मिळतात.

Vivo Y17s फोन १२ नॅनोमीटर प्रोसेसरवर आधारित मीडियाटेक हेलिओ जी ८५ चिपसेटसह सादर करण्यात आला आहे. डिवाइस ६जीबी रॅम आणि ६जीबी एक्सपांडेबल रॅमला सपोर्ट करतो, म्हणजे एकूण १२जीबी पर्यंत रॅम मिळेल. फोनमध्ये १२८ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. जी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं १टीबी पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा: टेक्नो देणार सॅमसंग-ओप्पोला टक्कर; Tecno Phantom V Flip 5G चा भारतीय लाँच कंफर्म

Vivo Y17s मध्ये युजर्सना ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलची लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. डिवाइस ५०००एमएएचची बॅटरी आणि १५वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.