Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
iOS 17 मध्ये काय आहे नवीन
Facetime: iOS 17 च्या ऑडिया-व्हिडीओ कॉलिंगमध्ये मोठा अपग्रेड दिसेल. आता तुम्ही तुमचा व्हिडीओ किंवा ऑडियो मेसेज रेकॉर्ड करू शकता. तसेच हे फीचर Apple TV सह देखील इंटिग्रेट करण्यात आलं आहे. आता तुम्ही टीव्हीवरून देखील व्हिडीओ कॉलिंग करू शकता आणि iPhone च्या कॅमेऱ्याचा वापर करू शकता.
हे देखील वाचा: टेक्नो देणार सॅमसंग-ओप्पोला टक्कर; Tecno Phantom V Flip 5G चा भारतीय लाँच कंफर्म
iMessage: नवीन ऑपरेटिंग सिस्टमच्या iMessage फीचरमध्ये बदल करण्यात आला आहे. तुम्हाला सर्व अॅप्स ‘+’ बटनसह दिसतील. ह्यात तुम्हाला फोटोज, ऑडियो मेसेज आणि लोकेशनचा पर्याय मिळेल.
Swipe to Reply: iOS 17 मध्ये कॅच अप अॅरो दिसेल दिसेल, ज्यामुळे तुम्ही आधीच्या मेसेजवर जाऊ शकता. इतकेच नव्हे तर तुम्ही स्वाइप करून न वाचता मेसेजला रिप्लाय देऊ शकता.
Search Filter: अॅप्पलच्या नवीन ऑपरेटिंग सिस्टममध्ये सर्च फिल्टर मिळेल. ज्याच्या मदतीनं तुम्ही कोणताही मेसेज सहज सर्च करू शकाल.
Personalised Phone Calls: Apple iOS 17 मध्ये नवीन पर्सनलाइज्ड फोन कॉल्सचा ऑप्शन मिळेल. ह्यात युजर्स आपल्या आयफोनवर इनकमिंग कॉलसाठी आवडीचा फोटो किंवा इमोजी सेट करू शकतात. फोन रिंग झाल्यावर फोटो किंवा इमोजी दिसेल.
NameDrop: अॅप्पलच्या नवीन ऑपरेटिंग सिस्टममध्ये नवीन NameDrop फीचर आलं आहे. हे फीचर वापरून तुम्ही तुमच्या iPhone चे कॉन्टॅक्ट इतरांशी सहज शेयर करू शकाल.
iOS 17 ऑपरेटिंग सिस्टम कशी डाउनलोड करायची
Apple iOS 17 डाउनलोड करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
- सर्वप्रथम तुमच्या iPhone च्या सेटिंग्स मध्ये जा.
- त्यानंतर General सेटिंग्स ऑप्शनवर टॅप करा.
- पुढील विंडोवर तुम्हाला सॉफ्टवेयर अपडेटचा पर्याय मिळेल.
- सॉफ्टवेयर अपडेटवर टॅप करून नवीन iOS 17 चा अपडेट चेक करू शकता.
- अपडेट उपलब्ध झाल्यावर डाउनलोड अँड इंस्टॉल बटनवर टॅप करा आणि नवीन ऑपरेटिंग सिस्टम डाउनलोड करून घ्या.
- iOS 17 अपडेट डाउनलोड करण्यापूर्वी तुमचा iPhone चांगल्या इंटरनेट नेटवर्क किंवा Wi-Fi शी कनेक्ट करा.
- फोन अपडेट करण्यापूर्वी तुमच्या फाईल्स बॅकअप करून घ्या.
हे देखील वाचा: लाँच होताच iPhone 15 सीरीजवर ६००० रुपयांचा डिस्काउंट; अशी आहे प्री बुकिंग ऑफर
कोणत्या iPhones वर मिळणार iOS 17 अपडेट
- iPhone 14
- iPhone 14 Plus
- iPhone 14 Pro
- iPhone 14 Pro Max
- iPhone 13
- iPhone 13 mini
- iPhone 13 Pro
- iPhone 13 Pro Max
- iPhone 12
- iPhone 12 mini
- iPhone 12 Pro
- iPhone 12 Pro Max
- iPhone 11
- iPhone 11 Pro
- iPhone 11 Pro Max
- iPhone XS
- iPhone XS Max
- iPhone XR
- iPhone SE 2020