Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तुमच्या घरच्या भिंतीला बनवा हाय डेफिनेशन टीव्ही; Portronics Beem 420 प्रोजेक्टर लाँच

12

पोर्टोनिक्स Beem 420 पोर्टेबल प्रोजेक्टर भारतात लाँच करण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की प्रोजेक्टरमध्ये चित्रपटगृहाचा लार्जर-दॅन-लाइफ एक्सपीरिएंस मिळेल. हा मल्टीमीडिया प्रोजेक्टर तुमची टीव्ही बघण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकू शकतो, असा दावा कंपनीनं केला आहे. ह्यामुळे घराची संपूर्ण भिंत स्क्रीनमध्ये रूपांतरित होईल. त्यामुळे तुम्हाला घरच्या घरी चित्रपटगृहाचा अनुभव मिळेल.

किंमत आणि उपलब्धता

हा प्रोजेक्टर डिस्काउंट नंतर ११९९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल. प्रोजेक्टर खरेदीवर १२ महिन्यांची वॉरंटी मिळत आहे. हा कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवरून विकत घेता येईल. तसेच ग्राहक हा प्रोजेक्टर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरून देखील खरेदी करू शकतील.

हे देखील वाचा: ३४ हजारांमध्ये आयफोन! परवडणाऱ्या iPhone SE 3 ची किंमत आणखी कमी, पाहा ऑफर

स्पेसिफिकेशन्स

ह्या प्रोजेक्टरचं स्क्रीन प्रोजेक्शन २५० इंचापर्यंत आहे. म्हणजे एका मिनी थिएटर सारख्या मोठ्या स्क्रीनवर चित्रपट पाहता येतील. ह्या प्रोजेक्टरमध्ये शार्प फुल एचडी १०८० पिक्सल रेजोल्यूशन मिळतं. प्रोजेक्टरवर आवडीचा ओटीटी चित्रपट, टीव्ही शोज पाहता येतील. ह्यात ३२०० ल्युमेन्स पर्यंतची ब्राइटनेस मिळते. प्रोजेक्टर मध्ये इंटेलिजंट इन-बिल्ट सेन्सर आहे, जो वर्टिकल कीस्टोन आणि फोकस एडजस्टमेंटसह स्टॅन्ड किंवा ट्रायपॉडविना ८.१ मीटरपर्यंत जवळपास कोणत्याही अँगलवर ठेवता येतो.

हे देखील वाचा: WhatsApp Group Calling: व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलिंगमध्ये मोठा बदल; एका क्लिकमध्ये संपूर्ण ग्रुपला करा कॉल

हा लॅपटॉप आणि मीडिया प्लेयर्सशी कनेक्ट करता येईल. ह्यात दोन एचडीएमआय पोर्ट देण्यात आले आहेत. त्याचबरोबर जुन्या डीव्हीडी प्लेयर, सेट-टॉप बॉक्ससाठी एव्ही इनपुट देखील आहे. तुमच्या होम व्हिडीओजसाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देखील मिळतो. प्रोजेक्टरमधील व्हायरलेस स्क्रीन मॉनिटरिंग फीचर तुमच्या स्मार्टफोन, टॅबलेट आणि लॅपटॉपला पोर्टेबल एंटरटेनमेन्ट हबमध्ये रूपांतरित करतो. ह्यात ५ वॉटचे इंटरनल स्पिकर ऑडियो देण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या चित्रपट प्रेमींना ओटीटी वरचा कंटेंट देखील चित्रपटगृहाच्या माहोलमध्ये पाहण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा डिवाइस बेस्ट आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.