Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
एचपीनं लाँच केला बजेट फ्रेंडली गेमिंग लॅपटॉप; 32GB RAM असलेल्या HP Omen 16 सह Victus 16 ची भारतात एंट्री
HP Omen 16 आणि Victus 16 ची किंमत
HP Omen 16 गेमिंग लॅपटॉप ११४,९९९ रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. तर Victus 16 ची किंमत ८६,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे, जी गेमिंग लॅपटॉपच्या दृष्टीनं बजेट फ्रेंडली आहे. दोन्ही लॅपटॉप्स सह कंपनी HyperX Cloud II Core वायरलेस गेमिंग हेडसेट मोफत देत आहे. परंतु त्यासाठी कंपनीच्या ऑफिशियल साइटवरून खरेदी करावी लागेल.
हे देखील वाचा: ४जी फोनला देखील मिळणार १.५ जीबीपीएसचा स्पीड; उद्या लाँच होणार Jio AirFiber
HP Omen 16 चे स्पेसिफिकेशन्स
ह्या लॅपटॉपमध्ये १६.१ इंचाचा क्वॉड एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट २४० हर्ट्झ आहे. ह्याचे रिजोल्यूशन १९२०×१०८० आहे. ह्या लॅपटॉपमध्ये ३०० निट्झची मॅक्सिमम ब्राइटनेस देण्यात आली आहे. तसेच, हा लॅपटॉप AMD Ryzen 9 7940 HS प्रोसेसरसह बाजारात आला आहे, जोडीला ३२जीबी पर्यंत रॅम आणि १टीबी पर्यंतची पर्यंतच्या स्टोरेज मिळते.
ग्राफिक्ससाठी NVIDIA GeForce RTX 4070 जीपीयू देण्यात आला आहे. हा लॅपटॉप Windows 11 Home एडिशनवर चालतो. व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्यात १०८० फुलएचडी आयआर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 83Wh ची बॅटरी देण्यात आली आहे. ह्याचे डायमेंशन ३६.९ x २५.९ x २.२९ सेमी आणि वजन २.२९किलोग्रॅम आहे.
HP Victus 16 चे स्पेसिफिकेशन्स
Victus 16 लॅपटॉपमध्ये देखील १६.१ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट १४४ हर्ट्झ आहे. ह्या लॅपटॉपमध्ये ३०० निट्झची मॅक्सिमम ब्राइटनेस देण्यात आली आहे. तसेच, हा लॅपटॉप AMD Ryzen 7 7840HS प्रोसेसरसह बाजारात आला आहे, सोबत ३२जीबी पर्यंत रॅम आणि ५१२टीबी पर्यंतची स्टोरेज मिळते.
हे देखील वाचा: ३४ हजारांमध्ये आयफोन! परवडणाऱ्या iPhone SE 3 ची किंमत आणखी कमी, पाहा ऑफर
तर ग्राफिक्ससाठी NVIDIA GeForce RTX 3050 जीपीयूचा वापर करण्यात आला आहे. हा लॅपटॉप देखील Windows 11 Home एडिशनवर चालतो. ह्यात देखील १०८० फुलएचडी आयआर वेबकॅमेरा देण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये ७०वॉट अव्हरची बॅटरी देण्यात आली आहे. ह्याचे डायमेंशन ३६.९ x २५.९ x २.२९ सेमी आणि वजन २.२९ किलोग्रॅम आहे.