Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Jio AirFiber सेवा ‘या’ ८ शहरांमध्ये लाँच; ५९९ रुपयांपासून प्लॅन सुरू, मिळेल १ जीबीपीएस पर्यंत स्‍पीड

9

Jio AirFiber सेवा भारतात लाँच झाली आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने रिलायन्स जिओनं हायस्‍पीड इंटरनेट सर्व्हिस ‘Jio AirFiber’ लाँच केली आहे. देशातील ८ मेट्रो शहरांमध्ये ही सेवा सादर करण्यात आली आहे. कंपनीनं दोन प्रकाराचे प्लॅन बाजारात आणले आहेत. सर्वात स्वस्त प्लॅन ५९९ रुपयांचा आहे. Jio AirFiber कनेक्‍शनची खासियत म्हणजे ग्राहकांना कोणत्याही केबल म्हणजे वायरविना अल्‍ट्रा हायस्‍पीड इंटरनेट सर्व्हिस दिली जाईल.

Jio AirFiber ह्या शहरांमध्ये लाँच

Jio AirFiber ची सर्व्हिस दिल्ली, मुंबई, हैद्राबाद, कोलकात्ता, अहमदाबाद, बेंगलूरू, चेन्नई आणि पुण्यात लाइव्ह करण्यात आली आहे. हे एक इंटीग्रेटेड एडं-टू-एडं सोल्यूशन आहे, ज्यात होम एंटरटेनमेंट, स्मार्ट होम सर्व्हिस आणि हाय-स्पीड ब्रॉडबँड सारख्या सेवा मिळतील.

वाचा: आता WhatsApp वर येईल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मेसेज; चॅनेल केलं सुरु, असं करू शकता जॉइन

Jio AirFiber चे दोन प्लॅन सादर

Jio AirFiber मध्ये दोन तरह के प्‍लान सादर केले आहेत. ज्यांची नावे एयर फायबर आणि एयर फायबर मॅक्स अशी ठेवण्यात आली आहेत. एयर फायबर प्लॅनमध्ये ग्राहकांना दोन प्रकाराच्या स्पीडचे प्लॅन मिळतील. ३० एमबीपीएस आणि १०० एमबीपीएस. Jio AirFiber ३० एमबीपीएस प्लॅनची किंमत ५९९ रुपये आहे. १०० एमबीपीएसच्या एयर फायबर प्लॅनसाठी ८९९ रुपये द्यावे लागतील. दोन्ही प्लॅन्समध्ये ग्राहकांना ५५० पेक्षा जास्त डिजिटल चॅनेल आणि १४ एंटरटेनमेंट अ‍ॅप मिळतील.

Jio AirFiber चा १०० एमबीपीएस स्पीड असलेला आणखी एक प्लॅन सादर झाला आहे. याची किंमत ११९९ रुपये दरमहा आहे. ह्या प्लॅनमध्ये अनेक चॅनेल व अ‍ॅप्सचा सपोर्ट असेल, तसेच नेटफ्लिक्स, अ‍ॅमेजॉन आणि जिओ सिनेमा सारख्या प्रीमियम अ‍ॅप्सचा अॅक्‍सेस देखील मिळेल.

AirFiber Max मधील प्लॅन

Jio नं सांगितलं आहे की ज्या ग्राहकांना जास्त इंटरनेट स्‍पीड हवा, ते ‘एयर फायबर मॅक्स’ प्लॅन निवडू शकतात. ज्यात कंपनीनं ३०० एमबीपीएस पासून १००० एमबीपीएस म्हणजे १ जीबीपीएस पर्यंतचे तीन प्लॅन सादर केले आहेत. ३०० एमबीपीएस स्‍पीड असलेल्या प्‍लानची किंमत १४९९ रुपये दरमहा आहे. ५०० एमबीपीएस स्‍पीडच्या प्लॅनची किंमत २४९९ रुपये आहे. १ जीबीपीएस स्पीड असलेला प्लॅन ३९९९ रुपयांचा आहे. सर्व प्लॅन्स सह ५५० पेक्षा जास्त डिजिटल चॅनेल, १४ एंटरटेनमेंट अ‍ॅप आणि नेटफ्लिक्स, अ‍ॅमेजॉन आणि जिओ सिनेमा सारखे प्रीमियम अ‍ॅप्स देखील मिळतील.

वाचा: एचपीनं लाँच केला बजेट फ्रेंडली गेमिंग लॅपटॉप; 32GB RAM असलेल्या HP Omen 16 सह Victus 16 ची भारतात एंट्री

Jio AirFiber लास्ट माइल कनेक्टिव्हिटीचा अडथळा दूर करण्यासाठी सादर करण्यात आली आहे. ह्या सर्व्हिसच्या माध्यमातून कंपनी २० कोटी घरांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करेल. कंपनीनं स्पष्ट केलं आहे की प्लॅन घेणार्‍या ग्राहकांना लेटेस्‍ट वाय-फाय राउटर, ४के स्‍मार्ट सेट-टॉप बॉक्‍स आणि व्हॉइस अ‍ॅक्टिव्ह रिमोट फ्री दिला जाईल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.