Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Vivo V29 series ची लाँच डेट टीज
Vivo.com वरील मायक्रो साइटवर जेव्हा तुम्ही ‘नो मोर’ वर क्लिक करता तेव्हा “Stay Tuned till We Meet on October 4” असा मेसेज येतो. त्यामुळे ४ ऑक्टोबर ही व्ही२९ सीरिजची लाँच डेट असू शकते, असा अंदाज लावला जात आहे. कंपनीनं व्ही२९ आणि व्ही२९ प्रो ची डिजाईन, डायमेंशन, कलर्स आणि कॅमेरा अशी माहिती देखील ह्या साइटवर लिस्ट केली आहे. तसेच जागतिक बाजारात देखील ही सीरिज गेल्या महिन्यात आली होती, त्यामुळे बरीच माहिती उपलब्ध आहे. हे फोन भारतात ४० हजारांच्या बजेटमध्ये लाँच होऊ शकतात.हे देखील वाचा: रेडमीचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन येतोय उद्या; परवडणाऱ्या किंमतीत Redmi Note 13 Series लाँचसाठी सज्ज
Vivo V29, V29 Pro चे स्पेसिफिकेशन
विवो व्ही२९ सीरिजमधील थ्रीडी पार्टीकल डिजाइन टीज करत आहे. हे फोन ७.४६ मिमी जाड असू शकतात तसेच ह्यांचे वजन १८६ ग्राम असू शकते. दोन्ही फोन हिमालयन ब्लू, मॅजेस्टिक रेड आणि स्पेस ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध होऊ शकतात.
विवो व्ही२९ प्रोमध्ये ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळू शकतो जो सोनी आयएमएक्स७६६ सेन्सर आहे. जोडीला सोनी आयएमएक्स६६३ पोर्टेट कॅमेरा म्हणून आणि १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळेल. त्याचबरोबर नाइट पोर्ट्रेटसाठी ऑरा लाइट देण्यात येईल. तसेच वेडिंग स्टाइल फोटोजसाठी कंपनीनं ड्रीमी बोके इफेक्टचा समावेश केला आहे.
विवो व्ही२९मध्ये ५० मेगापिक्सलचा आयसोसेल जीएन५ सेन्सर मुख्य कॅमेऱ्याची जबाबदारी सांभाळेल. तर जोडीला ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळेल. दोन्ही फोन्समध्ये ५० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल.
टीजरनुसार, प्रो मॉडेलमध्ये कर्व डिस्प्ले मिळेल. ग्लोबल मॉडेलनुसार विवो व्ही२९ मध्ये ६.७८ इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले मिळेल, जो १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट, १.५के रिजोल्यूशन आणि एचडीआर१०+ प्लेबॅकला सपोर्ट करेल. विवो व्ही २९ मध्ये ४,६००एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते जी ८० वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो.
हे देखील वाचा: जगावेगळ्या डिजाइनसह दुमडणारा Honor V Purse स्मार्टफोन लाँच, १६जीबी रॅमसह ७.७१ इंचाची भलीमोठी स्क्रीन
विवो व्ही २९ सिरीजमध्ये अँड्रॉइड १३ आधारित फनटच ओएस मिळू शकतो. विवो व्ही२९ च्या ग्लोबल मॉडेलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७७८जी चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. व्ही२९ मध्ये ८ जीबी रॅम+ १२८जीबी स्टोरेज, ८जीबी रॅम + २५६जीबी स्टोरेज आणि १२जीबी रॅम + २५६जीबी स्टोरेज मिळेल. प्रो मॉडेल देखील असेच व्हेरिएंट मिळू शकतात.