Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात विविध पदांची भरती! आजच करा अर्ज..

10

राज्य सरकारच्या अंतर्गत येणार्‍या महा-आयटी (MITC) म्हणजे म्हणजेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ या विभागात भरती सुरू आहे. या भरती अंतर्गत विविध विभागातील रिक्त पदे भरली जाणार असून थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. यामध्ये वित्त अधिकारी, लेखापरीक्षण अधिकारी, वरिष्ठ खाते कार्यकारी या पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांनुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी थेट मुलाखतीकरिता हजर राहायचे आहे . ही मुलाखत २६ सप्टेंबर २०२३ रोजी होईल. या भरतीसंदर्भातील सविस्तर तपशील पुढील प्रमाणे….

‘महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ भरती २०२३’ संदर्भात सविस्तर माहिती…

पदाचे नाव आणि पदसंख्या:
वित्त अधिकारी : १
लेखापरीक्षण अधिकारी : १
वरिष्ठ खाते कार्यकारी : २
एकूण रिक्त जागा : ४

(वाचा: NFC Recruitment 2023: आण्विक इंधन कॉम्प्लेक्स अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी महाभरती! आजच करा अर्ज..)

शैक्षणिक पात्रता: बी.कॉम/ सीए इंटर आणि संबधित कामाचा ३ ते ५ वर्षांचा अनुभव. तसेच प्रत्येक पदासाठी या व्यतिरिक्त सविस्तर शैक्षणिक पात्रता असून त्यासाठी सविस्तर अधिसूचना वाचावी.

निवड प्रक्रिया: या भरतीमध्ये मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

मुलाखतीचा पत्ता: महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ लिमिटेड, तिसरा मजला, अपीजे हाऊस, केसी कॉलेज जवळ, चर्चगेट, मुंबई- ४००२०

मुलाखतीची तारीख: २६ सप्टेंबर २०२३

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाची अधिकृत वेबसाईट: mahait.org

या भरती संदर्भात सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://mahait.org/Site/CurrentOpening या लिंकवर क्लिक करावे. त्यामध्ये प्रत्येक पदाच्या पर्यायासमोर एक चिन्ह आहे, ज्यावर क्लिक करून तुम्ही सविस्तर नोटिफिकेशन वाचू शकता.

निवड प्रक्रिया: या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीला वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे. अर्जदारांनी २६ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत नोंदणी करणे आवश्यक आहे. फक्त नोंदणीकृत पात्र अर्जदारांचीच मुलाखत घेतली जाईल.

(वाचा: CPCB Recruitment 2023: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांची भरती! जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम तारीख..)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.