Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Redmi Note 13 Pro Series ची किंमत
Redmi Note 13 Pro
- 8GB + 128GB – १,४९९ चायनीज युआन (सुमारे १७,५०० रुपये)
- 8GB + 256GB – १,६९९ चायनीज युआन (सुमारे १९,७०० रुपये)
- 12GB + 256GB – १,८९९ चायनीज युआन (सुमारे २२,००० रुपये)
- 12GB + 512GB – १,९९९ चायनीज युआन (सुमारे २३,१०० रुपये)
- 16GB + 512GB – २,०९९ चायनीज युआन (सुमारे २४,३०० रुपये)
हे देखील वाचा: एकच नंबर! २२ हजारांत १२ जीबी रॅम + २५६जीबी स्टोरेज; बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी Motorola Edge 40 Neo ची एंट्री
Redmi Note 13 Pro+
- 12GB + 256GB – १,९९९ चायनीज युआन (सुमारे २२,८०० रुपये)
- 12GB + 512GB – २,१९९ चायनीज युआन (सुमारे २५,००० रुपये)
- 16GB + 512GB – २,२९९ चायनीज युआन (सुमारे २६,२०० रुपये)
सध्या चीनमध्ये आलेले हे फोन्स लवकरच भारतीय बाजारात देखील दाखल होतील, अशी अपेक्षा आहे.
रेडमी नोट १३ प्रो आणि रेडमी नोट १३ प्रो+ चे स्पेसिफिकेशन्स
दोन्ही फोन्समध्ये ६.६७-इंचाचा १.५के फुल एचडी+ अॅमोलेड डिस्प्ले मिळतो. जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १,८०० निट्झ पीक ब्राइटनेस मिळते. सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा आहे.
Redmi Note 13 Pro+ मीडियाटेक डायमेंसिटी ७२०० अल्ट्रा चिपसेटसह बाजारात आला आहे. तर Redmi Note 13 Pro मध्ये स्नॅपड्रॅगन ७ जेन २ प्रोसेसर देण्यात आला आहे. दोन्ही फोन १६ जीबी पर्यंत रॅम आणि ५१२ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात. दोन्ही फोन अँड्रॉइड १३ आधारित एमआयूआय १४ वर चालतात.
रेडमी नोट १३ प्रो सीरिजची खासियत म्हणजे ह्यातील OIS सपोर्ट असलेला २०० मेगापिक्सलचा सॅमसंग ISOCELL HP3 कॅमेरा. त्याचबरोबर ८ मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Redmi Note 13 Pro+ मध्ये १२० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५,००० एमएएची बॅटरी आहे. तर Redmi Note 13 Pro मध्ये ५,१००एमएएची बॅटरी फक्त ६७ वॉट फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.
हे देखील वाचा: iPhone 15 सीरिजवर मिळवा मोठा डिस्काउंट; ईएमआयवर घेतल्यास कंपनीचं देतेय सूट, आजपासून सुरु झाली विक्री
दोन्ही फोन ३.५ मिमी हेडफोन जॅक, आयआर ब्लास्टर, ड्युअल सिम ५जी, वायफाय ६, ब्लूटूथ ५.३, एनएफसीला सपोर्ट करतात. त्याचबरोबर पाणी आणि धुळीपासून बचाव करण्यासाठी आयपी६८ रेटिंग देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर सिक्योरिटीसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर ही मिळतो.