Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
वेळापत्रकानुसार, गेट परीक्षा ३ ते ११ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घेतली जाईल. ही परीक्षा देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे. तर, GATE 2024 चे प्रवेशपत्र ३ जानेवारी २०२४ रोजी उपलब्ध करून दिले जाईल आणि १६ मार्च २०२४ च्या सुमारास निकाल जाहीर केला जाईल. तथापि, निकालापूर्वी उत्तर की (Answer Key) आणि अंतिम उत्तर की (Final Answer Key) देखील प्रसिद्ध केली जाईल.
(वाचा : NExT Entrance Exam Updates: MBBS विद्यार्थ्यांसाठी NMC ने जारी केली मार्गदर्शक तत्वे, ‘नेक्स्ट’बाबत मोठी घोषणा)
अधिसूचनेनुसार, सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांना अर्जासाठी १ हजार ८०० रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC, ST, PWD आणि महिला उमेदवारांना ९०० रुपये भरावे लागतील. त्याचबरोबर दोन पेपरसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एका परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत दुप्पट रक्कम भरावी लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, GATE साठी एकूण ३० चाचणी पेपर उपलब्ध असतील. गेट इंग्रजीमध्ये आयोजित केले जाईल. परीक्षेत MCQ प्रश्न विचारले जातील. परीक्षेदरम्यान कोणत्याही उमेदवाराला कॅल्क्युलेटर इ. नेण्याची परवानगी दिली जाणार नाही. परीक्षेदरम्यान कोणत्याही उमेदवाराकडे फसवणुकीशी संबंधित कोणतीही सामग्री आढळल्यास, त्याची उमेदवारी रद्द केली जाईल. शिवाय, त्याच्यावर कायदेशीर कारवाईही केली जाणार आहे.
(वाचा : आयआयटी गुवाहाटीमध्ये ‘डेटा सायन्स’ आणि ‘एआय’ अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जाना सुरुवात; JEE दिलेल्या उमेदवारांना प्राधान्य)