Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Vivo T2 Pro 5G ची किंमत
Vivo T2 Pro 5G चे दोन व्हेरिएंट भारतीयांच्या भेटीला आले आहेत. ह्यातील ८जीबी रॅम + १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २३,९९९ रुपये आहे. तर ८जीबी रॅम +२५६जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत २४,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा मोबाइल न्यू मून ब्लॅक आणि डून गोल्ड कलरमध्ये विकत घेता येईल. ह्या मोबाइलची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर २९ सप्टेंबरपासून सुरु होईल.
हे देखील वाचा: आता राडा होणार! १७,५०० मध्ये २०० मेगापिक्सलचा कॅमेरा; Redmi Note 13 Pro आणि Pro+ आले बाजारात
Vivo T2 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स
नव्या विवो फोनमध्ये ६.७८ इंचाचा एचडी प्लस ३डी कर्व अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, २४०० × १०८० पिक्सेल रिजॉल्यूशन, १३०० निट्स पीक ब्राइटनेस, ३८८पीपीआयला सपोर्ट करतो. कंपनीनं ह्यात टी७ प्लस टेक्नॉलॉजी दिली आहे. डिवाइस अँड्रॉइड १३ आधारित फन टच ओएस १३ वर चालतो.
Vivo T2 Pro 5G मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७२०० प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. जो ४ नॅनोमीटर प्रोसेसवर बनला आहे आणि ह्याचा क्लॉक स्पीड २ × २.८ गिगाहर्टझ + ६ × २.० गिगाहर्टझ आहे. जोडीला ८जीबी रॅम आणि २५६जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. तसेच ८जीबी एक्सपांडेबल रॅमच्या मदतीनं १६जीबी पर्यंत रॅमची ताकद मिळवता येते.
डिवाइस ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात आला आहे. ज्यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलाइजशन टेक्नॉलॉजीसह देण्यात आला आहे. त्याचबरोबर २ मेगापिक्सलची बोकेह लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
हे देखील वाचा: १००एमपी कॅमेरा असलेला सर्वात स्वस्त रेडमी फोन आला; जाणून घ्या Redmi Note 13 5G ची किंमत
पावर बॅकअपसाठी ४६०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. जी ६६वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याचबरोबर Vivo T2 Pro 5G मध्ये ब्लूटूथ ५.३, वाय-फाय आणि ड्युअल सिम ५जी सारखे बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन मिळतात. सिक्योरिटीसती इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि पाणी व धुळीपासून वाचण्यासाठी आयपी५२ रेटिंग मिळते.