Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

क्लॅट २०२४ परीक्षा प्रादेशिक भाषांमध्येही होणार; जाणून घ्या या महत्त्वपूर्ण बदलांविषयी

15

CLAT Admission 2024: देशभरातील लॉ कॉलेजमध्ये एलएलबी, एलएलएम आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट (सीएलएटी) घेतली जाते. नुकतीच दिल्ली उच्च न्यायालयात इंग्रजी व्यतिरिक्त प्रादेशिक भाषांमध्ये CLAT परीक्षा आयोजित करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. ज्याच्या उत्तरात एजन्सीने म्हटले आहे की CLAT 2024 प्रवेश परीक्षा आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये आयोजित केली जाऊ शकते. याबाबतचे प्रतिज्ञापत्रही संस्थेने उच्च न्यायालयात दाखल केले आहे.

(वाचा : GATE 2024: अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली, आता या तारखेपर्यंत करता येणार अर्ज)

खरे पाहता, या संपूर्ण प्रकरणात सरन्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने एनटीएला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले होते. यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खंडपीठाने म्हटले की, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये घेता येतात, मग सीएलएटी का नाही? अखेर ही परीक्षा इंग्रजीतूनच का घेतली जात आहे? या प्रश्न खंडपीठाने अधोरेखित केला आहे.

या प्रश्नाचे उत्तर देताना एनटीएने न्यायालयाला सांगितले की, त्यांच्याकडे अनेक भाषांमध्ये प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी तज्ञ आणि अनुवादकांचा एक गट आहे. अशा स्थितीत आगामी परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये घ्यायच्या असतील तर तिसर्‍या किंवा चौथ्या आठवड्यात होऊ शकतात. कारण प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी जास्तीत जास्त ४ महिने लागू शकतात.

“अशा परिस्थितीत, Common Law Admission Test (कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट) (CLAT)-UG परीक्षा येत्या काळात आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओरिया, पंजाबी, तमिळ, तेलगू, उर्दू या भाषांमध्ये घेतली जाऊ शकते. एलएलबी आणि इतर विधी अभ्यासक्रमांना CLAT परीक्षेसाठी दरवर्षी लाखो उमेदवार बसतात. त्यांनंतर, परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना LLB मध्ये प्रवेश दिला जातो.

(वाचा : NEET PG कौन्सिलिंग 2023 च्या तिसर्‍या फेरीचे वेळापत्रक जाहीर, आजपासून करा नोंदणी)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.