Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पदवीधारक उमेदवारांसाठी नाबार्डमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; १५० जागांसाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस

10

NABARD Assistant Manager Recruitment 2023: कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक २३ सप्टेंबर २०२३ रोजी सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी नोंदणी प्रक्रिया बंद करेल. ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे ते नाबार्डच्या अधिकृत वेबसाइट nabard.org वर अर्ज करू शकतात.

नाबार्डच्यावतीने प्रसिह करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, प्राथमिक परीक्षा किंवा निवड प्रक्रियेचा पहिला टप्पा १६ ऑक्टोबर २०२३ रोजी घेण्यात येईल. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण १५० पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. प्रिलिम्समध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार याबद्दलची अधिक माहिती तपासू शकतात.

उमेदवारांना नियोजित तारखेपर्यंत त्यांचे अर्ज सबमिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कारण त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही. याशिवाय, उमेदवारांना सूचना वाचल्यानंतरच अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो. कारण चुकीचा भरलेला फॉर्म स्वीकारला जाणार नाही.

(वाचा : Mumbai University: मुंबई विद्यापीठात सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाची सुरुवात; दर तासाला १२०० लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया)

असा करा अर्ज :

१. National Bank For Agriculture & Rural Development (NABARD) मधील जागांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असणार्‍या उमेदवारांना नाबार्डच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज करणे अनिवार्य असणार आहे.

२. नाबार्ड भरतीचा अर्ज, ऑनलाइन अर्ज शुल्क आणि आवश्यक कागदपत्र आपलो करणे गरजेचे असणार आहे.

३. नाबार्डच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त इतर मार्गानी प्राप्त झालेले अर्ज, आणि दिलेल्या तारखेनंतर भरले जाणारे अर्ज नाकारले जाऊन, सदर भरतीसाठी अशा उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.

अर्ज फी :

SC/ST/PWD श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्जाची फी रु १५०/-
आणि इतर सर्वांसाठी रु ८००/- ठेवण्यात आली आहे.
शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरले जाईल.
(सदर भरतीसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांना अर्ज शुल्क भरणे अनिवार्य असून, हे अर्ज शुल्क विना-परतावा Non Refundable तत्वावर घेण्यात येईल)

महत्त्वाच्या लिंक्स :

नाबार्डच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

नाबार्डच्या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा : Google Internship 2024: गुगलमध्ये इंटर्नशीप करा आणि नोकरी मिळवा; ऑनलाइन अर्ज उपलब्ध)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.