Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नुकतेच बोहल्यावर चढलेल्या परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे शिक्षण तुम्हाला माहिती आहे का? कॉलेजमध्येच झाली होती पहिली ओळख

8

Parineeti Chopra And Raghav Chadha Education: ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटातील परिणितीने साकारलेली गायत्रीची भूमिका असो, ‘हसी तो फसी’ या चित्रपटात मीताची भूमिका असो, ‘ढिशूम’ मधील मुस्कान, ”नमस्ते इंग्लंड’मधील जसमीत कौर आणि ‘केसरी’ चित्रपटातील जिवानी असो. तिच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका तिने उत्तमरित्या साकारली. तर, बॅडमिंटनपटू सायना नेहवालवर आधारित चित्रपटात परिणितीने साकारलेल्या सायनाच्या भूमिकेमुळे तिने प्रेक्षकांची मने जिंकली.

आपल्या भिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलेली ही अभिनेत्री शिक्षणातही मागे नाही. Parineeti Chopra ने अंबाला येथील कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी स्कूलमधून (Convent of Jesus & Mary, Ambala – CJM, Ambala) तिने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी इंग्लंडमधील मँचेस्टर बिझनेस स्कूलमधून ( Manchester Business School) व्यवसाय, वित्त आणि अर्थशास्त्र ऑनर्सची (Honors in Business Finance and Economics) पदवी प्राप्त केली.

तर, आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) राज्यसभा खासदार आणि सर्वात तरुण खासदार असलेले राघव चढ्ढा यांचे दिल्लीच्या मॉडर्न स्कूलमधून (Modern School, Delhi) त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून (Delhi University) वाणिज्य (Commerce Graduate) शाखेतून त्यांनी पदवी घेतली आहे.

राघव चढ्ढा हे चार्टर्ड अकाउंटंट (Chartered Accountant : CA) असून सध्या चार्टर्ड अकाउंटन्सीचा सराव करत आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियामधून (The Institute of Chartered Accountants of India) त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट्सचा अभ्यास केला आहे. राघव चढ्ढा यांनीही परदेशातून उच्च शिक्षण घेतले आहे. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून (London School of Economics and Political Science) EMBA Certification (Executive Master of Business Administration Certification) कोर्स केला आहे. याशिवाय त्यांनी अनेक अकाउंटन्सी फर्ममध्येही काम केले आहे.

राघव चढ्ढा यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल सांगायचे झाल्यास, इंडिया अगेन्स्ट करप्शन आंदोलनादरम्यान (India Against Corruption Movement) त्यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची भेट घेतली. यानंतर, आम आदमी पार्टीच्या स्थापनेच्या वेळी, ते त्याच्या सुरुवातीच्या सदस्यांपैकी एक होते आणि ते अजूनही पक्षात कार्यरत आहेत.

त्यामुळे, या जोडप्याच्या शिक्षणाबद्दल सांगायचे झाल्यास, अभिनयाच्या जगात आपला ठसा उमटवण्यापूर्वी परिणीतीने फायनान्सचे शिक्षण घेतले आहे. परिणीती मँचेस्टर बिझनेस स्कूलमधून बिझनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्समध्ये ट्रिपल ऑनर्सचे (Honors in Finance and Economics) शिक्षण घेतले होते. राघवने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे.

परिणिती आणि राघव दोघेही पहिल्यांदा कॉलेज काळात भेटले होते, या दोघांनाही इंग्लंडमध्ये इंडिया युके आउटस्टँडिंग अचिव्हर्स अवॉर्डने (India UK Outstanding Achievers Award) सन्मानितही करण्यात आले होते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.