Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Galaxy S23 FE आणि अन्य FE डिवाइस
रिपोर्टनुसार Samsung Galaxy S23 FE सह गॅलेक्सी बड्स एफई देखील वेबसाइटवर दिसले होते. कंपनीनं गॅलेक्सी एस२३ एफई आणि गॅलेक्सी टॅब एस९ एफई देखील लिस्ट केला गेला होता. त्याचबरोबर गॅलेक्सी एस२३ एफईच्या एका इमेजवर ४ ऑक्टोबरची लाँच डेट देण्यात आली होती. त्यामुळे ही फॅन एडिशन मोबाइल आणि अन्य डिवाइसची ग्लोबल डेट असेल, हे स्पष्ट झालं आहे.
हे देखील वाचा: Redmi Note 12 च्या किंमतीत मोठी कपात; आता बजेटमध्ये बसणार ६जीबी रॅम असलेला फोन
Samsung Galaxy S23 FE इंडिया लाँच डेट
अलीकडेच Samsung Galaxy S23 FE फोनचा नवीन टीजर पोस्टर समोर आला होता. त्यानंतर सॅमसंग इंडियानं आपल्या एक्स हँडलवरून फोनची इमेज शेयर करून लाँचच्या बातमीला दुजोरा दिला. परंतु लाँच डेट सांगितली नाही. फोन जागतिक बाजारासह ४ ऑक्टोबरलाच भारतात देखील सादर होऊ शकतो. हा डिवाइस अॅमेझॉनवर सेलसाठी उपलब्ध होईल, हे मात्र कंफर्म झालं आहे.
Samsung Galaxy S23 FE चे संभाव्य स्पेसिफिकेशन
Samsung Galaxy S23 FE मध्ये ६.४-इंचाचा फुलएचडी+ डायनॅमिक AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ जेन १ चिपसेट मिळू शकतो. फोन अँड्रॉइड १३ आधारित युआय ५.१ वर बेस्ड असू शकतो.
हे देखील वाचा: आयफोनला टक्कर देणाऱ्या Google Pixel 8, 8 Pro ची किंमत लीक, पुढील आठवड्यात येणार बाजारात
फोनमध्ये OIS सपोर्ट असलेला ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि १२ मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स मिळू शकतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो. फोनमध्ये ४,५००mAh ची बॅटरी आणि २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह दिली जाऊ शकते.