Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
CTET 2023 परीक्षा २० ऑगस्ट रोजी विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली. सदर परीक्षेची Answer Key १५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. आता अंतिम नमूना उत्तर पत्रिका (Final Answer Key) जाहीर होईल आणि त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
सप्टेंबरच्या शेवटच्या तारखेपर्यंत निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, निकाल जाहीर करण्याच्या तारखा अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे, उमेदवारांनी आमच्या वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून त्यांची कोणतीही माहिती चुकू नये.
(वाचा : ABC ID for College Students: कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आता एबीसी आयडी महत्त्वाचे; पदवी आणि पदव्युत्तरांना होणार हा फायदा)
अशा प्रकारे तुम्ही CTET 2023 ऑगस्टचा निकाल डाउनलोड करू शकता :
– सर्व प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
– यानंतर तुम्हाला अॅडमिट कार्ड लिंकवर क्लिक करावे लागेल.
– तुम्हाला वैयक्तिक तपशील प्रविष्ट करावा लागेल आणि सबमिट करावा लागेल.
– निकाल समोर दिसेल.
– निकालाची प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.
केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि लष्करी शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी CTET परीक्षा घेतली जाते. CTET ही पात्रता परीक्षा आहे आणि तिचे प्रमाणपत्र आयुष्यभर वैध राहते.
सीटीईटीमध्ये दोन पेपर आहेत. इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंत शिक्षक म्हणून अर्ज करू शकणार्यांसाठी पहिला पेपर घेतला जातो. तर, दुसरा पेपर ६ वी ते ८ वी पर्यंतच्या इयत्तामध्ये शिक्षक म्हणून अर्ज करणाऱ्यांसाठी घेतला जातो. CTET परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. पहिली परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेतली जाते. तर दुसरी डिसेंबर-जानेवारीमध्ये घेतली जाते.
(वाचा : Mathematics Phobia: गणितात कमी मार्क्स मिळण्याची तुम्हालाही भीती वाटते का? या ७ टिप्स वापरा Math चे टेन्शन पळून जाईल)