Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कमी किंमतीत ८जीबी रॅम असलेला 5G Phone; ३ ऑक्टोबरला सुरु होईल LAVA Blaze Pro 5G ची विक्री

7

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की भारतीय स्मार्टफोन निर्माता लावाचा ५जी फोन लाँच करणार आहे. त्यानुसार आज LAVA Blaze Pro 5G बाजारात सादर करण्यात आला आहे. हा स्वस्त स्मार्टफोन फक्त १२,४९९ रुपयांमध्ये आला आहे ज्यात ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ५,००० एमएएचची बॅटरी सारखे स्पेसिफिकेशन्स मिळतात. चला जाणून घेऊया ह्या स्मार्टफोनची किंमत.

LAVA Blaze Pro 5G ची किंमत

लावा ब्लेज प्रो ५जी स्मार्टफोनचा ८जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज असलेला एकमेव मॉडेल भारतात आला आहे. ज्याची किंमत १२,४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. LAVA Blaze Pro 5G ची विक्री ३ ऑक्टोबरपासून सुरु होईल. कंपनीनं स्मार्टफोनचे Starry Night आणि Radiant Pearl कलर व्हेरिएंट बाजारात आले आहेत. हा हँडसेट ऑनलाइनसह ऑफलाइन देखील विकला जाईल.

हे देखील वाचा: Telegram Update: स्टोरीजला जोडता येणार म्युजिक; नवीन अपडेटमध्ये भन्नाट फिचर

LAVA Blaze Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

लावा ब्लेज प्रो ५जी मध्ये ६.७८ इंचाचा फुलएचडी+डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक पंच होल डिस्प्ले आहे जो १०८० x २४६० पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. तसेच ही २.५डी कर्व्ड स्क्रीन आहे जी १२०हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. फोन अँड्रॉइड १३ ओएसवर लाँच झाला आहे.

कंपनीनं ह्यात ७ एनएम प्रोसेसरवर बनलेला मीडियाटेक डायमेन्सिटी ६०२० ऑक्टाकोर चिपसेट दिला आहे, ज्याचा क्लॉक स्पीड २.२गीगाहर्ट्झ आहे. ह्या लावा मोबाइलमध्ये ८जीबी रॅम देण्यात आला आहे तर वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजीच्या मदतीनं १६जीबी पर्यंत वाढवता येते. तसेच फोनमध्ये १२८जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून १टीबी पर्यंत एक्सपांड करता येईल.

फोटोग्राफीसाठी लावा ब्लेज प्रो ५जी ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एआय लेन्ससह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्या फोनमध्ये ८ मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: प्रतीक्षा संपली! Flipkart Big Billion Days Sale मधील डील्स आणि ऑफर्सचा खुलासा, तारीखही समजली

लावा ब्लेज प्रो ५जी फोन ८ 5G Bands ना सपोर्ट करतो. ह्यात ड्युअल नॅनो सिम, ३.५एमएम हेडफोन जॅक, एफएम रेडियो, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि OTG सपोर्ट देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी LAVA Blaze Pro 5G फोनमध्ये ५,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी ३३वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.