Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
itel S23+ ची किंमत
itel S23+ चा एकच मॉडेल कंपनीनं भारतात लाँच केला आहे. हा फोन ८जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेजसह बाजारात आला आहे. कंपनीनं ह्याची किंमत १३,९९९ रुपये ठेवली आहे.
हे देखील वाचा: प्रतीक्षा संपली! Flipkart Big Billion Days Sale मधील डील्स आणि ऑफर्सचा खुलासा, तारीखही समजली
itel S23+ स्पेसिफिकेशन्स
आयटेल एस२३+ मध्ये १०८० x २४०० पिक्सल रिजोल्यूशन असलेला ६.७८ इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा ३डी कर्व्ड अॅमोलेड पॅनलवर बनला आहे जो इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो. त्याचबरोबर गोरिल्ला ग्लास ५ ची सुरक्षा देण्यात आली आहे.
स्मार्टफोन अँड्रॉइड १३ वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी Unisoc Tiger T616 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो २गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो. सोबत ८जीबी रॅम मिळतो, ज्यात ८जीबी वचुर्अल रॅम मिळवून एकूण १६जीबी रॅमची ताकद मिळवता येते.
हे देखील वाचा: कमी किंमतीत ८जीबी रॅम असलेला 5G Phone; ३ ऑक्टोबरला सुरु होईल LAVA Blaze Pro 5G ची विक्री
फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलइडी फ्लॅशसह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे सोबत सेकंडरी एआय लेन्स आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी itel S23+ ३२ मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. आयटेल एस२३ प्लस मध्ये पावर बॅकअपसाठी ५,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ही बॅटरी १८वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.