Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
डुडलमध्ये काय आहे?
गुगलनं जे डुडल बनवलं आहे त्यात गुगलच्या लोगोमध्ये झालेल्या बदल दिसत आहेत. लोगोमध्ये झालेले सर्व बदल दाखवल्यानंतर गुगल २५ अशी अक्षरे दिसतात. त्यावर क्लिक करताच एक पेज ओपन होत आहे ज्यात स्क्रीनवर डिजिटल कंफेटी उडते आणि गुगलची माहिती दाखवण्यात आली आहे.
हे देखील वाचा: Nothing लाँच केला नवा ब्रँड CMF; Watch Pro, Buds Pro आणि चार्जर भारतात सादर
कशी झाली गुगलची सुरुवात
१९९० च्या दशकात अमेरिकेतील स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये कंप्युटर सायन्सचा अभ्यास करणारे दोन विद्यार्थी होते. त्यांची नावे सर्गेई ब्रिन आणि लॅरी पेज अशी होती. दोघांचीही भेट झाली तेव्हा त्यांना आपलं व्हिजन जवळपास एक सारखं असल्याचं समजलं. त्यांना वर्ल्ड वाइड वेबचा प्रसार करायचा होता. त्यांनी आपल्या हॉस्टलच्या खोलीतूनच सर्च इंजिनचं एक प्रोटोटाइप तयार केलं. आणि जेव्हा त्यावर पूर्ण वेळ काम करण्याचा निर्णय घेतला गेला तेव्हा Google चं पाहिलं ऑफिस म्हणून एक गॅरेज भाड्यानं घेतलं गेलं.
त्यानंतर Google चा लोगो अनेकदा बदलत गेला. सध्या जगातील अब्जावधी लोक वेबवर सर्च करण्यासाठी ह्या प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. आजचं डुडल रशियासह काही देश सोडले तर संपूर्ण जगात प्रसिद्ध करण्यात आलं आहे. आता गुगलचं मुख्यालय माउंटेन व्यू, कॅलिफोर्नियामध्ये अॅम्पिथियटर टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये आहे ज्याचे नाव Googleplex आहे.
हे देखील वाचा: आला भारतातील सर्वात स्वस्त ५जी स्मार्टफोन, किंमत फक्त ९६९९ रुपये
विशेष म्हणजे १९९८ पासून सुरु झालेल्या गुगल कंपनीनं आपली सुरुवात एका छोट्याशा गॅरेजमधून केली होती. आता गुगल एक मोठी कंपनी बनली आहे आणि आज हजारो लोकांना रोजगार देते. तसेच रोज हजारो लोक इथे नोकरीसाठी अर्ज करतात. गुगलनं आता अनेक देशांमध्ये ऑफिस सुरु केले आहेत.