Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Xiaomi 13T आणि Xiaomi 13T Pro ची किंमत
Xiaomi 13T 5G चे ८जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज आणि १२जीबी व २५६जीबी स्टोरेज असे दोन मॉडेल आले आहेत. ह्या फोनची किंमत ६४९ युरोपासून सुरु होते म्हणजे सुमारे ५७,५०० रुपये. फोन ग्लास पॅनलसह Meadow Green आणि Black कलरमध्ये विकत घेता येईल. तर लेदर बॅक असलेला व्हेरिएंट Alpine Blue कलरमध्ये विकत घेता येईल.
Xiaomi 13T Pro मध्ये १२जीबी रॅम आणि १६जीबी रॅम शामिल. तसेच २५६जीबी, ५१२जीबी तसेच १टीबी स्टोरेज ऑप्शन आले आहेत. ह्याची किंमत ७९९ युरो म्हणजे ७०,५०० रुपयांपासून सुरु होते. शाओमी १३टी प्रो स्मार्टफोन Green, Black आणि Vegan Leather Blue व्हेरिएंटमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.
हे देखील वाचा: आला भारतातील सर्वात स्वस्त ५जी स्मार्टफोन, किंमत फक्त ९६९९ रुपये
Xiaomi 13T आणि Xiaomi 13T Pro चे स्पेसिफिकेशन्स
दोन्ही शाओमी फोन २७१२ x १२२० पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या ६.६७ इंचाच्या १.५के अॅमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतात. ही स्क्रीन १४४हर्ट्झ रिफ्रेश रेट, २६००निट्झ ब्राइटनेसला सपोर्ट करते. १३टी प्रो मॉडेलमध्ये क्रिस्टलरेज पॅनलचा वापर करण्यात आला आहे. दोन्ही फोन्स इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतात. ह्या शाओमी फोन्सची जाडी ८.४९एमएम आहे. बेस मॉडेलचे वजन १९३ग्राम तर प्रो मॉडेलचे वजन २०६ग्राम आहे.
Xiaomi 13T 5G फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ८२०० अल्ट्रा चिपसेट देण्यात आला आहे तर Xiaomi 13T Pro मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ९२०० अल्ट्रा चिपसेट आहे. ग्राफिक्ससाठी वॅनिला मॉडेलमध्ये माली-जी६१० जीपीयू तर प्रो मॉडेलमध्ये एआरएम-जी७१५ जीपीयू देण्यात आला आहे.
शाओमी १३टी तथा १३टी प्रो दोन्ही मोबाइल फोन आयपी रेटिंगसह येतात त्यामुळे वॉटरप्रूफ बनतात. त्याचबरोबर ह्या फोन्समध्ये आयआर ब्लास्टर, ब्लूटूथ ५.४ आणि वाय-फाय ५.० गिगाहर्ट्झ सह एनएफसीला देखील सपोर्ट करतात. दोन्ही शाओमी स्मार्टफोन्समध्ये ड्युअल स्पिकर्स देण्यात आले आहेत जो डॉल्बी अॅटमॉस ऑडियोला सपोर्ट करते आहेत.
खास बॅटरी सिस्टम
शाओमी १३टी ५जी फोन ६७वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो तर १३टी प्रो मध्ये १२०वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे. बेस मॉडेल ४२ मिनिटांत तर प्रो मॉडेल फक्त १९ मिनिटांत ० ते १०० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकतो. हे दोन्ही मोबाइल फोन ५,०००एमएएचच्या बॅटरीसह लाँच करण्यात आले आहेत. फोन्समध्ये Xiaomi Surge Battery Management System आहे जी फोन बॅटरीची हेल्थ चांगली ठेवते तसेच डिवाइस हिट व ओव्हरचार्ज होऊ देत नाही.
हे देखील वाचा: एका छोट्या गॅरेजमधून झाली होती Google ची सुरुवात, खास Doodle मधून पाहा २५ वर्षांचा प्रवास
जबरदस्त कॅमेरा
शाओमी १३टी ५जी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात ५० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स७०७ प्रायमरी सेन्सर, ५० मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर आणि १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी २० मेगापिक्सल सोनी आयएमएक्स५९६ लेन्स आहे.
शाओमी १३टी प्रोच्या मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात ५० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स ७०७ मुख्य कॅमेरा, ५० मेगापिक्सलचा ओम्नीव्हिजन ओव्ही५०डी टेलीफोटो सेन्सर तसेच १२ मेगापिक्सलचा ओम्नीव्हिजन ओव्ही१३बी अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आहे. तर फ्रंट पॅनलवर २० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स५९६ सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.