Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नीट पीजी प्रवेश तिसर्‍या फेरीचा जागा वाटपाचा निकाल उद्या जाहीर होणार; असा डाउनलोड करा निकाल

15

NEET PG Admissions 2023 Round-3 Seat Allocation Result: वैद्यकीय समुपदेशन समितीने (MCC) राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा पदव्युत्तर (NEET PG) समुपदेशनाच्या तिसऱ्या फेरीसाठी निवड लॉकिंग सुविधेचा निष्कर्ष काढला आहे. NEET PG 2023 साठी राउंड-३ चॉईस फिलिंग विंडो २७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता बंद झाली. अशा परिस्थितीत राऊंड-३ वाटपाचा निकाल लवकरच जाहीर होईल, असे मानले जात आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन जागा वाटपाचा निकाल ऑनलाइन तपासू शकतात.

देशात एकूण ७० हजार PG जागा उपलब्ध :

भारतात तब्बल ७०,००० पेक्षा जास्त PG वैद्यकीय जागा उपलब्ध आहेत. आजवरच्या अहवालांनुसार दरवर्षी यापैकी साधारण २ ते अडीज हजार जागा रिक्त राहतात. यावेळीही समुपदेशनाच्या दोन फेऱ्यांनंतर फिजिओलॉजी, अ‍ॅनाटॉमी आणि बायोकेमिस्ट्री या विषयांच्या अनेक जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आरोग्य मंत्रालयाकडे NEET PG चा पर्सेंटाइल कमी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिक्षण मंत्रालयाच्या आदेशानंतर प्रवेशाची ही टक्केवारी थेट शून्यावर (Zero Percentage) आणली गेली.

(वाचा : National Testing Agency ने जाहीर केले २०२४ मधील परीक्षांचे वेळापत्रक, यादिवशी होणार CUET, NEET, JEE आणि UGC परीक्षा)

शून्य टक्केवारीपूर्वीचा हा कटऑफ :

पर्सेंटाइल शून्य करण्यापूर्वी, NEET PG कट-ऑफ सामान्य आणि आरक्षित श्रेणीतील अर्जदारांसाठी ५० टक्के, अपंग व्यक्ती (PWD) अर्जदारांसाठी ४५ टक्के आणि इतर आरक्षित श्रेणींसाठी ४० टक्के होता.

NEET PG परीक्षा दरवर्षी घेतली जाते. ज्यामध्ये उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी होतात. NEET PG परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना PG मेडिकलच्या जागांवर प्रवेश दिला जातो.

(वाचा : NMC Recognition From WFME: डब्ल्यूएफएमई कडून एनएमसीला १० वर्षांसाठी मान्यता, MBBS च्या विद्यार्थ्यांना होणार हा फायदा)

NEET PG समुपदेशन फेरी-3 जागा वाटपाचा निकाल पहाण्यासाठी :

– सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर NEET PG राउंड-३ वाटप निकाल लिंकवर क्लिक करा.
– वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
– वाटपाचा निकाल दिसेल.
– वाटप निकालाची प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

(वाचा : NExT Entrance Exam Updates: MBBS विद्यार्थ्यांसाठी NMC ने जारी केली मार्गदर्शक तत्वे, ‘नेक्स्ट’बाबत मोठी घोषणा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.