Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बजेट लेव्हल फीचर्ससह OPPO A18 लाँच; फोनमध्ये ५,०००एमएएचची बॅटरी आणि ८जीबी रॅम

8

OPPO नं आपल्या ए सीरिजमध्ये एक नव्या मॉडेलचा समावेश केला आहे. कंपनीनं युएई मार्केटमध्ये OPPO A18 नावाचा स्मार्टफोन लाँच केला आहे. एंट्री-लेव्हल स्पेसिफिकेशनसह आलेला हा फोन बजेट सेगमेंटमध्ये उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे ह्या फोनचे स्पेसिफिकेशन्स Oppo A38 सारखे आहेत जो ह्या महिन्याच्या सुरवातीला जागतिक बाजारात लाँच झाला आहे. चला पाहूया ह्या नवीन फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.

OPPO A18 ची किंमत

ओप्पोने यूएई मध्ये ह्या नवीन फोनच्या किंमतीची घोषणा केली नाही. परंतु डिवाइस देशाच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट झाला आहे. स्मार्टफोन ग्लोइंग ब्लॅक आणि ग्लोइंग ब्लू रंगात सादर करण्यात आला आहे.

हे देखील वाचा: कर्ज काढून लाख रुपयांचा iPhone 15 Pro घेण्यापूर्वी ही बातमी वाचा; ग्राहकांना होत आहे पश्चाताप

OPPO A18 चे स्पेसिफिकेशन्स

OPPO A18 मध्ये ७२० x १६१२ पिक्सल रिजोल्यूशन असलेला ६.५६-इंचाचा एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट, ७२० निट्झ पीक ब्राइटनेस, १०० टक्के DCI P3 आणि १००% एसआरजीबी कलर गमुटला सपोर्ट करते. डिवाइसमध्ये वॉटर ड्रॉप नॉच आणि ८९ टक्के स्क्रीन टू बॉडी रशियो मिळतो.

फोनमध्ये कंपनीनं हेलीयो जी८५ चिपसेटचा वापर केला आहे. ग्राफिक्ससाठी Mali G52 MC2 जीपीयू देण्यात आला आहे. सोबत ४जीबी रॅम आणि १२८जीबी पर्यंत स्टोरेज आहे. रॅम वाढवण्यासाठी ४जीबी व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट देण्यात आला आहे. स्मार्टफोन अँड्रॉइड १३ आधारित कलरओएस १३.१ वर चालतो.

ह्यात मागे पिल शेप ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो जो ऑटो फोकसला सपोर्ट करतो. त्याचबरोबर २ मेगापिक्सलची पोर्ट्रेट लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

हे देखील वाचा: एक-दोन नव्हे तर Samsung च्या ४ मोबाइलच्या किंमतीत कपात; फक्त ६४९९ रुपयांमध्ये मिळेल नवा स्मार्टफोन

Oppo A18 मध्ये ५०००एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. जी ३३ वॉट सुपरवूक चार्जिंगला सपोर्ट करते. हँडसेट मध्ये यूएसबी टाइप पोर्ट, ३.५मिमी हेडफोन जॅक, ४जी, वाय-फाय, जीपीएस, साइड फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर सारखे फीचर्स आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.