Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नारायण राणे यांच्यावरील संभाव्य कारवाईबद्दल दीपक पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आहे. ‘शिवसेनेचे शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीवरून नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याची तक्रार त्यांनी केली आहे. त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्ह्याचा प्रकार आणि गांभीर्य बघता नारायण राणे यांना अटक करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अटक करण्यासाठी पथक रवाना झालं आहे. कायद्याप्रमाणे सर्व गोष्टी होतील. राणेंना अटक करून न्यायालयात हजर केलं जाईल, न्यायालय जो आदेश देईल त्यानुसार पुढील कारवाई होईल. राणेंनी आपलं निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध करावं,’ असं पांडे यांनी स्पष्ट केलं.
वाचा: नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह भाषा; राष्ट्रवादी भडकली!
‘नारायण राणे हे राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यामुळं त्यांच्यावरी अटकेच्या कारवाईनंतर राज्यसभेचे अध्यक्ष असलेल्या उपराष्ट्रपतींना माहिती दिली जाईल. त्याचबरोबर, इंटेलिजन्स ब्युरो, एसआयटी, जिल्हा दंडाधिकारी, न्याय दंडाधिकारी या सर्वांना माहिती दिली जाईल. राज्यघटनेनुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोघांवर क्रिमिनल केसेसमध्ये अटकेची कारवाई करता येत नाही. बाकीच्यांना ती मुभा नाही. ‘फॅक्ट ऑफ द केस’ पाहून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कारवाईची गरज का वाटली याची संपूर्ण माहिती आदेशात देण्यात आलेली आहे, असंही पांडे म्हणाले.