Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नारायण राणेंच्या वक्तव्याचे समर्थन होऊ शकत नाही, पण…; फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका

15

हायलाइट्स:

  • नारायण राणेंच्या वक्तव्याचे महाराष्ट्रात पडसाद
  • देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया
  • पक्षाची भूमिका केली स्पष्ट

मुंबईः ‘नारायण राणेंच्या (Narayan Rane) वक्तव्यांचे समर्थन होऊ शकत नाही पण भाजपच्या कार्यालयावर कोणी हल्ला केला तर आम्ही सहन करणार नाही,’ असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. भाजप राणेंच्या त्या वक्तव्याचं समर्थन करत नसली तरी भाजप नारायण राणेंच्या पाठिशी उभी आहे, अशी भूमिका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी म्हटलं आहे.

नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले आहेत. राज्यातील विविध भागात शिवसैनिकांनी आंदोलनं केली आहेत. तर, नाशिकमध्ये भाजप कार्यालयावर हल्ला केला होता. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला इशारा दिला आहे.

वाचाः मुंबईत शिवसैनिकांची राणेंविरोधात पोस्टरबाजी; निलेश राणेंनी दिलं थेट आव्हान

‘नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेले वक्तव्यामुळं मोठा वाद निर्माण झाला आहे. बोलण्याच्या भरात कदाचित राणे ते वाक्य बोलले असतील. ते वाक्य वापरण्याचे त्यांच्या मनात असेल असं वाटत नाही. मुख्यमंत्री पद हे एक महत्त्वाचं पद आहे. त्या पदावरील व्यक्तीबद्दल बोलत असताना संयम बाळगणं आवश्यक आहे, असं आमचं मत आहे. महाराष्ट्राचे मुख्यंमत्री स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विसरतात त्यामुळं कोणाच्या मनात संताप निर्माण होऊ शकतो. पण तो वेगळ्या पद्धतीने निषेध म्हणून व्यक्त केला जाऊ शकतो,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘सरकार ज्याप्रकारे कारवाई करते त्याचं समर्थन होऊ शकत नाही. वासरु मेलं तर गाय मारू अशापकारे सरकार करत असेल तर भाजपा नारायण राणेंच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नसेल पण नारायण राणेंच्या पाठीशी उभा राहणार आहे,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं आहे.

वाचाः नाशिकमध्ये वातावरण पेटले; शिवसेना- भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

‘शर्जिल उस्मानी महाराष्ट्रात येतो हिंदूंबाबत बोलतो. त्याच्यावर कारवाई होत नाही. पण नारायण राणेंना पकडण्याकरता संपूर्ण पोलिस फोर्स उभी आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मी आयुक्तांचे पत्र वाचलं ते का स्वतःला छत्रपती समजतात का, जा त्यांच्या मुसक्या बांधा, हजर करा असे आदेश देतात. कोणत्या कायद्याने हा अधिकार दिला. पोलिसांचा गैरवापर चालला आहे. महाराष्ट्रातल्या पोलिसांचा मला नितांत आदर आहे, संपूर्ण देशात निष्पक्ष पोलिस दल म्हणून महाराष्ट्रातील पोलिस दलाची ख्याती आहे. पण या पोलिस दलाचा ऱ्हास मी पाहतोय. सरकारने बस म्हटल्यावर काही जण लोंटागण घालतात. केवळ सरकारला खुश करण्यासाकरता पोलिस दल कारवाई करायला लागलं तर महाराष्ट्राची प्रतिमा तशी राहणार नाही. आधीच ती वसुली कांड अशी झाली आहे. अलीकडच्या काळात पोलीसजीवी सरकार झालं आहे,’ अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

नॉर्मल माणूस वाटलो काय?; मी पण डबल आक्रमकः नारायण राणेंचे शिवसेनेला उत्तर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.