Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Best Smartphones under 10K: तुमच्या बजेटमध्ये येतील हे स्मार्टफोन्स, फीचर्सही जबरदस्त

10

एंट्री-लेव्हल स्मार्टफोन्समध्ये प्रामुख्याने मोठा डिस्प्ले आणि चांगली बॅटरी लाइफ पहिली जाते. परंतु २०२३ मध्ये कंपन्या यापेक्षा जास्त फीचर्स देत आहेत. कंपन्या आपल्या एंट्री-लेव्हल स्मार्टफोन्समध्ये देखील आता ५जी कनेक्टिव्हिटी आणि हाय-रिफ्रेश रेट डिस्प्ले देऊ लागल्या आहेत. २०२३ पूर्वी एंट्री-लेव्हल स्मार्टफोनमध्ये बेसिक फीचर्स दिले जात होते. अनेकजण जास्त फीचर्ससाठी जास्त पैसे खर्च करण्यासाठी तयार असतील परंतु काही असे युजर्स देखील आहेत ज्यांच्या बजेट मर्यादित आहे किंवा आपला पहिला स्मार्टफोन विकत घेता आहेत. त्यांच्यासाठी १०००० रुपयांच्या सेगमेंटमध्ये देखील अनेक चांगले फोन आहेत. चला ते पाहूया.

Poco C51

६९९९ रुपयांमध्ये हा या लिस्टमध्ये सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. इतक्या कमी किंमतीत देखील पोकोनं ४जीबी रॅम आणि ६४जीबी स्टोरेज दिली आहे. फोनमध्ये ५,०००एमएएचच्या बॅटरीसह मीडियाटेक हीलियो जी३६ प्रोसेसर देण्यात आला आहे जो फोनमधील सॉफ्टवेयर स्मूद चालण्यास मदत करतो. ह्या फोनची किंमत खूप कमी आहे कारण हा फोन अँड्रॉइड १३ गो एडिशनवर चालतो. हा इंटरफेस स्मूद तर नाही परंतु कमी इंटरनल स्टोरेजचा वापर करतो आणि ह्यात अ‍ॅप्सची साइज देखील कमी असते. हा त्या लोकांसाठी आहे ज्यांना चांगली बॅटरी लाइफ असलेला स्मार्टफोन हवा आहे. ज्यातून कॉल्स, बेसिक अ‍ॅप्स आणि बेसिक कामं सहज करता येतील. हा फोन सिंगल चार्जमध्ये २ दिवसांपर्यंत चालू शकतो.

हे देखील वाचा: जगात कुठेही लाँच न झालेला फोन आहे Anushka Sharma कडे; आयफोन-सॅमसंग नव्हे तर ‘हा’ मॉडेल दिसला हातात

Realme Narzo N53

हा एक असा एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे जो जास्त स्टायलिश आहे. ह्यात ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन स्टाइल आणि डिजाइनवर फोकस ठेऊन बनवला आहे. फोनमध्ये तुम्हाला लुक आणि फील चांगला मिळेल. ह्या किंमतीत गेमिंगची अपेक्षा ठेवू नका परंतु ह्यातील यूनिसोक टी६१२ चिपसेट आहे जो चांगली कामगिरी करतो. ह्यात ठीकठाक कॅमेरा परफॉर्मन्स आणि ५०००एमएएचची बॅटरी मिळते. त्याचबरोबर ३३ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.

Lava Yuva 2 Pro

Realme प्रमाणे Lava चा हा फोन देखील लुक्सवर फोकस करतो. आयफोनसारखा दिसणाऱ्या रियर कॅमेरा मॉड्यूलसह हा फोन खूप स्लिम देखील आहे. ह्याचा रियर पॅनल ग्लासचा आहे जो ह्या सेगमेंटमध्ये मिळणं कठीण आहे. हा ६.५-इंचाच्या HD+ IPS LCD पॅनलसह येणारा हा स्मार्टफोन आहे. ह्यात मीडियाटेक हीलियो जी३७ चिपसेट देण्यात आला आहे जो दैनंदिन कामांसाठी योग्य आहे. फोनमध्ये अँड्रॉइड १२ मिळतो जी थोडी जुनी ऑपरेटिंग सिस्टम आहे. फोन स्टॉक अँड्रॉइड इंटरफेसवर चालतो ज्यात जास्त स्पॅम नोटिफिकेशन्स येत नाहीत. ह्यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. ह्याची कॅमेरा परफॉर्मन्स अ‍ॅव्हरेज आहे. हा फोन २ दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप देऊ शकतो.

Realme C55

रियलमीनं फोनद्वारे आयफोनची बरीच नक्कल केली आहे. ह्या फोनमध्ये आयफोनचा डायनॅमिक आयलँड फीचर कॉपी करण्यात आलं आहे. जे काही यशस्वी झालेलं नाही. ह्या फीचर्स व्यतिरिक्त फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी८८ चिपसेट देण्यात आला आहे जो अँड्रॉइड १३ च्या स्मूद फंक्शनला पावर देण्यासाठी योग्य आहे. यातील ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट डिस्प्ले, प्रीमियम डिजाइन आणि चांगल्या लाइटिंगमध्ये चांगली पिक्चर डिलिव्हरीमुळे ह्याची १०९९९ रुपये किंमत योग्य वाटते.

Moto E13

Moto चा हा फोन अँड्रॉइड १३ गो एडिशन डिवाइस आहे. ह्या लिस्टमध्ये हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन्स पैकी एक आहे. हा ६,७९९ रुपयांमध्ये २जीबी रॅमसह येतो. फोनमध्ये एर्गोनॉमिक डिजाइनसह डस्ट आणि वॉटर रेजिस्टंटसाठी आयपी५२ रेटिंग देण्यात आली आहे. ह्याचा ४जीबी रॅम व्हेरिएंट यूनिसोक टी६०६ सह डिसेंट सॉफ्टवेयर परफॉरमेंस देतो. ह्यात ड्युअल-बँड वायफायचं फीचर मिळतं. फोन टाइप-सी यूएसबी पोर्ट आणि एफएम रेडियोसह येतो. सर्व मोटोरोला डिवाइसेस प्रमाणे, सॉफ्टवेयर ह्या फोनचा स्ट्रांग पॉईंट आहे. कंपनीचा MyUX खूप कस्टमाइजेशनचे ऑप्शंस देतो आणि ब्लॉटवेयर-फ्री सॉफ्टवेयर एक्सपीरियंस देतो. ह्याची बॅटरी लाइफ ठीकठाक आहे आणि १ दिवस चालते.

हे देखील वाचा: गुपचुप भारतात लाँच झाला Vivo Y17s; बजेटमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ५००० एमएएचची बॅटरी

Lava Blaze 5G

Lava चा हा फोन ह्या लिस्टमध्ये एकमेव फोन आहे जो ओव्हरआल रेटिंगमध्ये चांगला म्हणता येईल. ह्याची किंमत १०,९९९ रुपये आहे. फोन चांगल्या बिल्ड-क्वॉलिटीसह येतो आणि ह्याचा रियर पॅनल ग्लासचा आहे. ह्यात टाइप-सी यूएसबी मिळते. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७०० चिपसेट देण्यात आला आहे जो ५जी कनेक्टिव्हिटी देखील देतो. परंतु सॉफ्टवेयर अँड्रॉइड १२ वरच आहे. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे जो दिवसाच्या प्रकाशात चांगला चालतो. ह्याची व्हिडीओ क्वॉलिटी चांगली म्हणता येईल. फोनमध्ये ५,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी सिंगल चार्जमध्ये एक दिवस पुरते. त्याचबरोबर १२वॉटचा चार्जर देण्यात आला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.