Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना दिली स्वच्छतेची शपथ; शिवाय, आशियाई खेळातील शुटींग खेळप्रकारात सुवर्ण पदक विजेता रुद्रांक्ष पाटील यांस रोख ५० हजाराचे बक्षिस जाहीर

12

University Of Mumbai: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त व विश्व अहिंसा दिनाचे औचित्य साधून समाजात अहिंसा आणि विश्व बंधुत्वाचा संदेश देण्यासाठी व मूल्याधिष्टित जीवन प्रणालीचे महत्व पटवून देण्यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे मंगळवार २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे भजनसंध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. या कार्यक्रमाचे उदघाटन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विख्यात बासुरी वादक पद्म विभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया, आशियाई खेळातील शुटींग खेळप्रकारात सुवर्ण पदक विजेता रुद्रांक्ष पाटील, पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, गायिका वैशाली माडे आणि चित्रपट लेखक कौस्तूभ सावरकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

(वाचा : ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमात मुंबई विद्यापीठाचा सहभाग; ३०० हून अधिक महाविद्यालयांचा उत्स्फुर्त श्रमदानात हातभार)

सर्वधर्म समभावाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक परंपरेची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी मान्यवर गायकांनी त्यांच्या सुमधूर स्वरांनी भजने सादर करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सर्वधर्म प्रार्थना, वैष्णव जण तो, हीच अमुचि प्रार्थना, पदमनाभा नारायणा, अल्ला तेरो नाम, बाजे मुरलिया बाजे, एक राधा एक मीरा, आज होना दिदार आणि गोंधळ अशी अनेक गीते सादर करण्यात आली. विश्व अहिंसा दिनाच्या निमित्ताने कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.

(वाचा : Mumbai University: मुंबई विद्यापीठात सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाची सुरुवात; दर तासाला १२०० लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया)

विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा मंडळाच्या ठरावानुसार नुकत्याच आशियाई खेळातील शुटींग खेळप्रकारात सुवर्ण पदक विजेता रुद्रांक्ष पाटील यांस रोख ५० हजाराचे बक्षिस जाहीर करण्यात आले. कुलगुरुंच्या हस्ते रुद्रांक्षचा सत्कार करण्यात आला. रुद्रांक्ष हा कीर्ती महाविद्यालयात बीए द्वितीय वर्षांत शिकत असून या पुरस्काराचा तो पहिला मानकरी ठरला.

या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठ, सलंग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे जवळपास ३ हजार विद्यार्थी उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग, संगीत विभाग, आजीवन अध्ययन विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि एनसीसी या सर्व विभागाच्या सयुंक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

(वाचा : Mumbai University: मुंबई विद्यापीठात यावर्षीपासून उत्कृष्ट संशोधक, संशोधन निधी आणि उत्कृष्ट विभाग पुरस्कार)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.