Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सॅमसंगला दणका देण्यासाठी येतोय Oppo Find N3 Flip; Clamshell डिजाइन असलेल्या फोल्डेबलचा भारतीय लाँच कंफर्म

7

मोबाइल निर्माता ओप्पोनं आपल्या दुमडणाऱ्या स्मार्टफोन Oppo Find N3 Flip चा भारतीय लाँच कंफर्म केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी हा फोन कंपनीच्या होम मार्केट चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. आता हा स्मार्टफोन इंडियन युजर्ससाठी उपलब्ध होईल. अद्याप लाँच डेट समोर आली नाही, परंतु हा फोन ह्या महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. चला, पाहूया नवीन टीजर आणि स्पेसिफिकेशन.

Oppo Find N3 Flip येतोय भारतात

सोशल मीडिया प्लॅटफॉम एक्सवर ओप्पोच्या ऑफिशियल हँडलच्या माध्यमातून कंपनीनं Oppo Find N3 Flip ची घोषणा केली आहे. तुम्ही पोस्टमध्ये पाहू शकता की कंपनीनं डिवाइस ‘कमिंग सून’ सह टीज केला आहे. पोस्टमध्ये मोबाइलच्या ट्रिपल कॅमेऱ्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: Flipkart ची नवीन VIP Subscription सर्व्हिस लाँच, स्वस्तात iPhone 15 सह मिळतील अनेक फायदे

त्याचबरोबर हा बेस्ट फ्लिप फोन असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. ओप्पो इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर Oppo Find N3 Flip फोन मूनलाइट म्यूज आणि सिल्व्हर सारख्या दोन कलरमध्ये दिसत आहे. परंतु लाँच डेटची माहिती सांगण्यात आलेली नाही, परंतु असा अंदाज लावला जात आहे की हा फोन ह्या महिन्यात लाँच होईल.

चीनमध्ये आलेल्या OPPO Find N3 Flip चे स्पेसिफिकेशन्स

ह्या मोबाइलमध्ये ६.८०-इंचाचा FHD+ अ‍ॅमोलेड इनर डिस्प्ले देण्यात आला आहे. जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. त्याचबरोबर ३.२६-इंचाचा कव्हर अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. डिवाइस अँड्रॉइड १३ आधारित कलरओएस १३.१ वर चालतो.

OPPO Find N3 Flip मध्ये मीडियाटेक डायमेंसीटी ९२०० चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी माली-जी७१५ इम्मोर्टलिस एमपी११ जीपीयू मिळतो. भारतात देखील हाच चिपसेट मिळू शकतो. अलीकडेच आलेल्या गीकबेंच लिस्टिंगमध्ये देखील हा चिपसेट समोर आला आहे. त्याचबरोबर १६जीबी पर्यंत रॅम आणि ५१२जीबी इंटरनल स्टोरेज मिळते.

OPPO Find N3 Flip मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये OIS सपोर्टसह ५० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स८९० प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि ३२ मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स आहे. तर सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

हे देखील वाचा: Google ची जागा घेण्याच्या तयारीत Apple; लवकरच येऊ शकतं कंपनीचं सर्च इंजिन

मोबाइलमध्ये ४३०० एमएएचची बॅटरी आणि ४४ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळत आहे. ह्यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, स्टीरियो स्पिकर, यूएसबी टाइप-सी पोर्ट, एनएफसी आणि ड्युअल सिम ५जी, वायफाय, ब्लूटूथ सारखे अनेक फीचर्स देखील आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.