Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कंप्युटरपेक्षा जास्त रॅम आणि आकर्षक लाल रंगात येतोय OnePlus 11R Solar Red 5G; कंपनीनं केली घोषणा

10

OnePlus 11R Solar Red 5G येत्या ७ ऑक्टोबरला भारतीयांच्या भेटीला येईल. परंतु लाँच पूर्वीच ह्या हँडसेटचे फीचर्स समोर आले आहेत. लीक्सनुसार, हा फोन १८ जीबी रॅमसह सादर केला जाईल. नावावरून समजले असेल की हा कंपनीच्या जुन्या वनप्लस ११आर ५जीचा रेड कलर व्हेरिएंट असेल. ह्यासाठी कंपनीनं अधिकृत वेबसाइटवर एक लँडिंग पेज देखील बनवलं आहे. जिथे Notify Me बटनवर क्लिक केल्यावर फोन लाँच झाल्यावर OnePlus कडून एक अलर्ट मिळेल.

रिपोर्ट्सनुसार, OnePlus 11R 5G Solar Red मध्ये १८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते. परंतु फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स जुन्या वनप्लस ११आर ५जी सारखे असतील, असा अंदाज लावला जात आहे. फोन लाँच होताच फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेल आणि अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये विकला जाईल.

हे देखील वाचा: Google ची जागा घेण्याच्या तयारीत Apple; लवकरच येऊ शकतं कंपनीचं सर्च इंजिन

OnePlus 11R Solar Red चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 11R Solar Red लेदर बॅक फिनिशसह येईल. त्याचबरोबर ह्यात स्नॅपड्रॅगन ८+ जेन १ प्रोसेसर दिला जाऊ शकतो. जोडीला १८जीबी एलपीडीडीआर५एक्स रॅम आणि ५१२जीबी स्टोरेज मिळेल. OnePlus चा दावा आहे की इतक्या रॅमसह एकाच वेळी ५० अ‍ॅप्स सहज वापरता येतील. OnePlus नुसार हा फोन गेमिंग दरम्यान ५९.४६ फ्रेम प्रति सेकंडचा सरासरी एफपीएस कायम राखेल.

हे देखील वाचा: सॅमसंगला दणका देण्यासाठी येतोय Oppo Find N3 Flip; Clamshell डिजाइन असलेल्या फोल्डेबलचा भारतीय लाँच कंफर्म

फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो, ज्यात ह्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाईल. त्याचबरोबर ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. फोन ५०००एमएएचच्या बॅटरीसह बाजारात येईल जी 100W SUPERVOOC चार्जिंगला सपोर्ट करेल. ब्रँडचा दावा आहे की फोन फक्त २५ मिनिटांत ० ते १०० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकतो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.