Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Samsung Galaxy S23 सीरिजमध्ये सर्वात स्वस्त मोबाइलची एंट्री; FE मॉडेल भारतातही झाला लाँच

9

गेले कित्येक दिवस सॅमसंगच्या एका स्मार्टफोनची जोरदार चर्चा सुरु होती, तो म्हणजे Samsung Galaxy S23 FE. आज अखेरीस हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आला आहे. हा कंपनीच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सचा फॅन्स एडिशन आहे. जो कमी किंमतीत दमदार स्पेसिफिकेशन्स देतो. चला पाहूया फोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.

Samsung Galaxy S23 FE चे स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी एस२३ एफई मध्ये ६.४ इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही डायनॅमिक अ‍ॅमोलेड २एक्स स्क्रीन आहे जी पंच होल डिजाईनसह सादर करण्यात आली आहे. त्याचबरोबर ह्यात १०८० x २३४० पिक्सल रिजोल्यूशन आणि १२०हर्ट्झ रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळतो. ही स्क्रीन गोरिल्ला ग्लास ५ नं प्रोटेक्ट करण्यात आली आहे. तसेच Eye Care Display असल्यामुळे दीर्घकाळ वापर करून डोळ्यांना ह्याचा जास्त त्रास होत नाही. हा स्मार्टफोन अ‍ॅल्युमिनियम फ्रेमवर बनवण्यात आला आहे.

हे देखील वाचा: Realme Festive Days Sale: ८ ऑक्टोबरपासून सुरु होईल रियलमीचा धमाकेदार सेल, अशा आहेत सर्व स्मार्टफोन डील्स

हा स्मार्टफोन अँड्रॉइड १३ आधारित वनयुआयवर चालतो. कंपनीनं प्रोसेसिंगसाठी ह्यात एक्सनॉस २२०० ऑक्टाकोर प्रोसेसर दिला आहे, जो २.८गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. हा ८जीबी रॅमसह लाँच झाला आहे सोबत १२८जीबी तसेच २५६जीबी स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं १टीबी पर्यंत वाढवता येते.

हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात आला आहे. ह्यातील मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे. तर सोबत १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि एक ८ मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी एस२३ एफई मध्ये १० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

हे देखील वाचा: अँड्रॉइडसाठी नवी ऑपरेटिंग सिस्टम येणार; अशाप्रकारे Google Pixel 8 Series लाँच इव्हेंट बघा लाइव्ह

पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एस२३ फॅन एडिशन मध्ये ४,५००एमएएचची बॅटरी मिळते. जी २५वॉट फास्ट चार्जिंग आणि फास्ट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. गॅलेक्सी एस२३ एफई ला आयपी६८ रेटिंग मिळाली आहे, त्यामुळे हा वॉटरप्रूफ तसेच डस्टप्रूफ बनतो. सिक्योरिटीसाठी मोबाइलमध्ये Samsung Knox आणि Samsung Knox Vault देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 14 5G Bands चा सपोर्ट, NFC, Wi-Fi 6E, Bluetooth v5.3 आणि USB Type-C सारखे फीचर्स मिळतात.

Samsung Galaxy S23 FE ची किंमत

Samsung Galaxy S23 FE चे दोन मॉडेल भारतात आले आहेत. परंतु कंपनीनं ह्या स्मार्टफोनची भारतीय किंमत सांगितली नाही. अमेरिकन बाजारात ह्याची किंमत ५० हजारांच्या आसपास सुरु होते. भारतीय किंमत येताच ही बातमी अपडेट केली जाईल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.