Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

यूपीएससी सीडीएस-२ लेखी परीक्षेचा निकाल जाहीर; निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी पुढील अर्ज भरावा लागणार

9

UPSC CDS-2 2023 Result Declared: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) संयुक्त संरक्षण सेवा, CDS 2 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. UPSC ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर निवडलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. UPSC CDS 2 ची परीक्षा ३ सप्टेंबर रोजी पार पडली होती.

सदर भरती मोहिमेद्वारे एकूण ३४९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. शिवाय, निवड झालेल्या या उमेदवारांना भारतीय लष्कराच्या विविध संस्थांमधील अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाणार आहे.

(वाचा : India’s Top 10 NIT’s: जेईई परीक्षेनंतर उच्च शिक्षणाच्या प्रवेशही गडबड होण्यापूर्वी, देशातील या सर्वोत्तम १० एनआयटीविषयी जाणून घ्या)

यूपीएससीद्वारे जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार, एकूण ६ हजार ९०८ उमेदवारांनी UPSC CDS II परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे. या निवडलेल्या उमेदवारांना आता SSB मुलाखतीला हजर राहावे लागणार आहे. या व्यतिर्किट परीक्षेसाठी पात्र नसलेल्या उमेदवारांच्या गुणपत्रिका, अंतिम निकाल जाहीर होण्याच्या १५ दिवस आधी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

निवड झालेल्या उमेदवारांच्या नावाची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आयोगाने प्रसिद्ध केलेल्या नोटीसनुसार, लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना आर्मी (IMA/OTA) म्हणून पहिली पसंती देण्यात आली आहे. यशस्वी उमेदवार www.join Indianarmy.nic.in या वेबसाइटवर SSB मुलाखतीसाठी नोंदणी करू शकतील. यासोबतच, ज्या उमेदवारांनी आधीच नोंदणी केली आहे त्यांना सूचना वाचून पुढील कार्यवाही करण्याचा सल्लाही या परिपत्रकात देण्यात आला आहे. CDS परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. पहिली परीक्षा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये घेतली जाते. तर दुसरी परीक्षा मे-जूनमध्ये होते.

(वाचा : ESIC Recruitment 2023: ईएसआयसी मध्ये १००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती; असा करा अर्ज)

निवड होणार्‍या उमेदवारांच्या SSB मुलाखती जुलै २०२४ मध्ये घेण्यात येणार असल्याचा नादाज आहे. मुलाखतीत निवडलेले उमेदवार इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून येथे १५७ व्या (DE) अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी पात्र थरौन त्यांना यासाठी प्रवेश देण्यात येईल.

निकाल तपासण्यासाठी :

– सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर CDS-2 रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
– एक पीडीएफ फाइल दिसेल.
– ते डाउनलोड करा आणि तुमच्याकडे ठेवा.
– आता तुमचे नाव शोधा.
– निवड झालेली असल्यास तुमचे नाव आणि रोल नंबर दिसेल.

(वाचा : Shloka Mehta Education: देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणून ओळख असणार्‍या अंबानी घराण्याची सून ‘श्लोका’चे शिक्षण तरी किती..?)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.