Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्सच्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमधील शैक्षणिक आणि शिक्षके कर्मचारी पदांसाठी भरती
या भरती मोहिमेअंतर्गत १० हजार ३९१ पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. ज्यामध्ये टीजीटी आणि वसतिगृह वॉर्डनच्या पदांसाठी ६ हजार ३२९ आणि शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदांवर (Teaching and Non-Teaching Staff) ४ हजार ०६२ रिक्त जागा आहेत.
(वाचा : Talathi Bharti Exam 2023 Result: आता उत्सुकता तलाठी भरती परीक्षेच्या निकलाची; ‘या’ दिवशी पाहता येणार रिझल्ट)
या भरतीसाठी आवश्यक परीक्षा या महिन्यात होणार आहे. उमेदवारांना प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा सल्ला दिला जातो कारण त्याशिवाय त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन मार्गदर्शक तत्त्वे वाचण्याचा आणि त्यानुसार परीक्षा हॉलमध्ये पोहोचण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. तसेच, उमेदवारांनी त्यांच्यासोबत फोटो ओळखपत्र असलेले ओळखपत्र सोबत ठेवणे गरजेचे आहे.
प्रवेशपत्र जारी झाल्यानंतर, उमेदवारांना वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करण्यात काही अडचण आल्यास उमेदवारांनी ०११-२२२४०११२ या हेल्पलाइनवर संपर्क साधून मदत मिळवू शकतील. यासोबतच, तुम्ही तुमची समस्या emrs.recruitment23@gmail.com या ईमेलद्वारे पाठवू शकता.
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी :
- सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
- यानंतर तुम्हाला अॅडमिट कार्ड लिंकवर क्लिक करावे लागेल.
- वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
- प्रवेशपत्र समोर असेल.
- प्रवेशपत्राची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.
(वाचा : SBI Specialist Officer Bharti 2023: अर्ज करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस; असा भरा तुमचा फॉर्म)