Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Google ची कमाल! स्मार्टवॉचमध्ये २जीबी रॅम; इतकी आहे Google Pixel Watch 2 ची किंमत

8

Google नं बुधवारी Google Pixel 8 सीरीजसह Google Pixel Watch 2 स्मार्टवॉच लाँच केलं आहे. नवीन सेकंड-जनरेशन वॉच Snapdragon W5+ Gen 1 चिपसेटसह बाजरात आलं आहे आणि सोबत 2GB रॅम देखील देण्यात आला आहे, त्यामुळे स्मार्टवॉचची परफॉर्मन्स चांगली मिळते. ह्यात ३०६एमएएचची बॅटरी मिळते जी Always On Display अ‍ॅक्टिव्ह ठेवून देखील २४ तासांचा बॅटरी बॅकअप देऊ शकते. ह्यात OLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

Google Pixel Watch 2 ची किंमत

नवीन Google Pixel Watch 2 ची भारतात किंमत ३९,९९० रुपये ठेवण्यात आली आहे. लाँच ऑफर अंतगर्त जे लोक नवीन Pixel 8 सीरीजचे स्मार्टफोन खरेदी करतील, त्यांना स्मार्टवॉच १९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. Pixel Watch 2 पॉलिश्ड सिल्व्हर/बे, मॅट ब्लॅक/ओब्सीडियन आणि अन्य कलर ऑप्शनमध्ये सादर केला गेला आहे. स्मार्टवॉच आता भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे.

हे देखील वाचा: ४३ इंचाचा डिस्प्ले असलेला नवीन 4K QLED TV लाँच, किंमत २७ हजारांपेक्षा कमी

Google Pixel Watch 2 चे स्पेसिफिकेशन्स

Google Pixel Watch 2 स्मर्टवॉचमध्ये ३८४ x ३८४ पिक्सल रिजॉल्यूशनसह सर्कुलर १.२-इंचाचा OLED डिस्प्ले मिळतो. ह्यात २जीबी रॅमसह Snapdragon W5+ Gen 1 चिप मिळते, जी ४नॅनोमीटर चिप आहे. स्मार्टवॉचमध्ये ३०६एमएएचची बॅटरी आहे, जी ऑलवेज ऑन डिस्प्ले सक्रिय असल्यावर देखील २४ तासांचा बॅकअप देऊ शकते. कंपनीनुसार, ह्यात १२ तासांच्या वापरासाठी फक्त ३० मिनिटांची चार्जिंग आवश्यक आहे.

वॉच जुन्या जनरेशन प्रमाणे कॉम्पॅक्ट ४१ मिमी डिजाइनसह येते. ह्यात काही सुधार देखील करण्यात आले आहेत, ज्यात जास्त टिकाऊ कव्हर ग्लास आणि १००% रीसायकल्ड अ‍ॅल्यूमीनियमचा समावेश आहे.

वॉच ६ महिन्यांच्या फिटबिट प्रीमियमसह येतं, ज्यामुळे तुमची परफॉर्मन्स तपासली जाईल आणि गोळा केलेल्या डेटाचे विश्लेषण करण्यासाठी AI चा वापर केला जाईल. हेल्थ आणि फिटनेस फीचर्समध्ये हाय पेस अ‍ॅक्टिव्हिटीसाठी अधिक अचूक मल्टी-पाथ सेन्सरसह ऑप्टिकल हार्ट रेट आणि ब्लड-ऑक्सीजन सेन्सरचा समावेश करण्यात आला आहे. हे वॉच तणाव ट्रॅक करतं आणि त्वचेचं तापमान देखील मोजतं. तसेच स्लीप क्वॉलिटी मेजर करण्याचं फिचर देखील ह्यात आहे.

हे देखील वाचा: Google चे सर्वात शक्तिशाली फोन भारतात लाँच; जाणून घ्या Pixel 8 आणि Pixel Pro ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

5ATM/IP68 रेटिंगसह, Google Pixel Watch 2 धुळीपासून वाचू शकतो आणि पूलमध्ये स्विमिंग करण्यासाठी उपयुक्त आहे. ह्यात UWB-सक्षम डिवाइसच्या अचूक ट्रॅकिंगसाठी UWB टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.