Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) मध्ये १६२ टेक्निशियन अप्रेंटिस पदांसाठी भरती; थेट मुलाखतीमधून होणार उमेदवारांची निवड
पदभरतीचा तपशील :
VSSC च्या या भरती मोहिमेत एकूण १६२ पदांवर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
मुलाखत दिनांक : ७ ऑक्टोबर २०२३ रोजी
मुलाखतीची वेळ: सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
मुलाखतीचा पत्ता : सरकारी पॉलिटेक्निक कॉलेज, कलामासेरी, एर्नाकुलम, केरळ.
(वाचा : Career In Marchant Navy: दहावी पास उमेदवारही भारतीय नौदलामध्ये करिअर घडवू शकतात; असा करता येईल अर्ज)
पदांनुसार भरतीचा तपशील :
एकूण रिक्त जागा : १६२ पदे
- ऑटोमोबाईल अभियांत्रिकी: ८ पदे
- रासायनिक अभियांत्रिकी: २५ पदे
- स्थापत्य अभियांत्रिकी: ८ पदे
- संगणक विज्ञान/अभियांत्रिकी: १५ पदे
- इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी: ४० पदे
- उपकरणे तंत्रज्ञान: ६ पदे
- यांत्रिक अभियांत्रिकी: ५० पदे
अधिसूचना pdf डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा : Talathi Bharti Exam 2023 Result: आता उत्सुकता तलाठी भरती परीक्षेच्या निकलाची; ‘या’ दिवशी पाहता येणार रिझल्ट)
वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता :
० या जागांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार राज्य मान्यताप्राप्त तांत्रिक मंडळाकडून अभियांत्रिकी पदविका (Engineering Diploma) प्रमाणपत्र प्राप्त केलेले उमेदवार अप्रेंटिसशिप प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात.
० उमेदवारांनी ऑटोमोबाईल / केमिकल / सिव्हिल / कम्प्युटर / सायन्स / इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंट / मेकॅनिकल इंजिनीअरिंग आणि इतरांसह संबंधित अभियांत्रिकी शाखांमध्ये प्रथम श्रेणी डिप्लोमा (First Class Diploma Pass-out) असणे आवश्यक आहे.
० २०१९ पूर्वी डिप्लोमा केलेले किंवा सध्या डिप्लोमाच्या अंतिम वर्षात असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत. त्यामुळे, अशा उमेदवारांनी अर्ज करू नये.
निवड प्रक्रिया :
संबंधित पात्रता परीक्षेत मिळालेल्या कमाल गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
(अधिक माहितीसाठी, कृपया VSSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.)
VSSC भर्ती 2023 साठी अर्ज करण्यासाठी :
- उमेदवारांना www.nats.education.gov.in किंवा www.sdcentre.org या वेबसाइटद्वारे शिक्षण मंत्रालयाच्या NATS पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी लागेल.
- मुलाखतीदरम्यान नोंदणी क्रमांक आणि प्रिंटआउट सोबत घेऊन जाणे अनिवार्य असेल.
- उमेदवारांना अधिसूचनेत नमूद केलेल्या सर्व आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या वेळेत, अधिसूचनेत नमूद केलेल्या ठिकाणी भेट द्यावी लागेल.
(वाचा : Success Story IAS Kartik Jivani: आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो तीनवेळा स्पर्धा परीक्षेला बसून तीनही वेळा यशस्वी झाला)