Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
एमबीबीएस अभ्यासक्रमांचा Passing Creteria ५० टक्क्यांचा; २०२० ची बॅच पहिल्यांदा देणार NEXT प्रवेश परीक्षा
दुरुस्तीची नोटिस प्रसिद्ध करत एनएमसीने एमबीबीएसचे उत्तीर्ण गुण ५० टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत कमी केल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, ज्या विषयात दोन पेपर असतील अशा विषयांमध्ये मिळून ४० टक्के गुण मिळाल्यावरही उमेदवार प्रवेशासाठी पात्र ठरणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने हा निर्णय मागे घेत, पूर्वीच्या Passing Criteria (उत्तीर्ण पद्धती) नुसार प्रवेश प्रक्रिया पार पडणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
(वाचा : New Medical Colleges in Maharashtra: राज्यात नव्या नऊ मेडिकल कॉलेजांची सुरुवात; राज्य सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा)
NEET PG मॉप अप राउंडचा सीट वाटप निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन जागा वाटपाचा निकाल ऑनलाइन तपासू शकतात. सदर निकाल तपासण्यासाठी अधिकृत पायऱ्या वेबसाइटवर दिल्या जाणार आहेत.
यासोबतच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने पुढील परीक्षेबाबत ७ सदस्यीय समितीचीही स्थापन केली आहे. ही समिती पुढील परीक्षेच्या तयारीचा अहवाल येत्या २ आठवड्यात सादर करणार आहे. त्यामुळे, २०२० बॅचच्या एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी नेक्स्ट परीक्षा लागू करणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
(वाचा : Before Confirming Your Admission: कोणत्याही विद्यापीठ किंवा कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करण्यापूर्वी हे नक्की तपासा)