Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जिल्हा परिषद भरतीअंतर्गत परीक्षेला सुरुवात; गैरप्रकार आढळल्यास तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश

14

Nashik ZP Bharti: महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या वतीने विविध संवर्गासाठी पदभरती करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) पदासाठी आज तर, विस्ताराधिकारी (सांख्यिकी) पदासाठी परीक्षा रविवार, ७ ऑक्टोबर २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.

रिगमन (दोरखंडवाला) या पदाठी १७, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) ७६२ परीक्षार्थींची परीक्षा होणार आहे. शनिवारी विस्ताराधिकारी (सांख्यिकी) पदासाठी एकूण एक हजार २८१ परीक्षार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत.

(वाचा : JEE Main 2024: जेईई मेन २०२४ची अर्ज नोंदनो प्रक्रिया लवकरच सुरू होणार, वयोमर्यादा आणि इतर पात्रता तपशील जाणून घ्या)

जिल्हा परिषद गट क भरतीप्रक्रिया परीक्षेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आढावा घेत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व व्हेन्यू ऑफिसर, परीक्षेशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी परीक्षा केंद्रांना देखील भेटी दिल्या होत्या.

आयबीपीएस कंपनीच्या वतीने सर्व व्हेन्यू ऑफिसर व संबंधित अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात टेस्ट सेंटर ॲडमिनिस्ट्रेशन यांची एकत्रित बैठक झाली. बैठकीत परीक्षेच्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन उपस्थित अधिकारी व परीक्षेशी संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या होत्या.

यामध्ये परीक्षा केंद्रांवर कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास तत्काळ गुन्हे दाखल करण्याचा निर्देशमुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. शिवाय, प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त पुरविण्यासाठीचे पत्र शहर पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षक (ग्रामीण) यांना देण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर रुग्णवाहिका व आरोग्य पथक तैनात करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आले आहेत.

(वाचा : Career In Marchant Navy: दहावी पास उमेदवारही भारतीय नौदलामध्ये करिअर घडवू शकतात; असा करता येईल अर्ज)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.