Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

यावर्षीची ‘नेट’ परीक्षा ६ ते २२ डिसेंबरला; अशी असेल अर्ज प्रक्रिया

14

NET 2024 Exam Dates: विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) साठी विविध विषयांच्या परीक्षा जाहीर केल्या आहेत. त्यासाठी २८ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत दिली आहे. शुल्क २९ ऑक्टोबरपर्यंत जमा केले जाईल. तर ३० आणि ३१ ऑक्टोबरला ऑनलाइन अर्जात सुधारणा करण्याची मुभा दिली आहे. परीक्षा ६ ते २२ डिसेंबर दरम्यान घेतली जाणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने डिसेंबर २०२३ च्या राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षेसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अधिसूचनेनुसार, युजीसी नेटसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २८ ऑक्टोबर, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ugcnet.nta.nic.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. तर, अर्जाचे शुल्क २९ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत भरता येईल. शुल्क भरणासह अर्ज सादर केल्‍यानंतर अर्जाची करण्याची वेबसाइट ३० ते ३१ ऑक्‍टोबर रोजी रात्री ११.५० पर्यंत पुन्‍हा उघडली जाणार आहे. ज्यानंतर, उमेदवार त्‍यांच्‍या ऑनलाइन फॉर्ममध्ये सुधारणा करू शकतील.

(वाचा : JEE Main 2024: जेईई मेन २०२४ची अर्ज नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार, वयोमर्यादा आणि इतर पात्रता तपशील जाणून घ्या)

नोव्‍हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा केंद्रांची घोषणा करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात नेट-सेट परीक्षांना महत्त्व दिले असून पीएच.डी करण्याची अट शिथील करण्यात आली आहे. प्राध्यापक पदांच्या नोकऱ्या मिळवण्यासाठी नेट-सेट परीक्षांना आता महत्त्व प्राप्त झाले आहे. पीएच.डी करण्याच्या प्रक्रीयेत बराच वेळ लागत असून, या परीक्षा झटपट नोकरी मिळवून देण्यासाठी उपयोगी ठरत आहेत.

अधिक महितीसाठी आणि यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक पहाण्यासाठी येथे क्लिक करा.

असा करा अर्ज :

– सर्व प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
– यानंतर तुम्हाला UGC NET December 2023 Registration वर क्लिक करावे लागेल.
– तुम्हाला वैयक्तिक तपशील प्रविष्ट करावा लागेल आणि सबमिट करावा लागेल.
– यानंतर यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल.
– आता UGC NET डिसेंबर 2023 फॉर्म भरा आणि सबमिट करा.
– यानंतर, फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

UGC NET म्हणजे काय?

UGC NET परीक्षा ही महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये असिस्टंट प्रोफेसर आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी पात्रता ठरवण्यासाठीची परीक्षा आहे. परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. पहिली परीक्षा मे-जूनमध्ये होते. तर दुसरी डिसेंबर-जानेवारीमध्ये घेतली जाते. दरवर्षी मोठ्या संख्येने उमेदवार परीक्षेला बसतात.

(वाचा : Talathi Bharti Exam 2023 Result: आता उत्सुकता तलाठी भरती परीक्षेच्या निकलाची; ‘या’ दिवशी पाहता येणार रिझल्ट)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.