Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
तलाठी परीक्षेच्या निकालाची अंतिम गुणवत्ता यादी १५ डिसेंबरला; २६ जानेवारीला राज्यपालांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार
राज्यात तलाठी भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार तलाठी पदासाठी नुकत्याच परीक्षा घेण्यात आल्या होत्या. मात्र, परीक्षेनंतर उमेदवार या परीक्षेच्या निकालची वाट पाहत होते. आता ही प्रतीक्षा संपून, तलाठी परीक्षेच्या गुणांसह अंतिम गुणवत्ता यादीची प्रसिद्ध केली जाणार आहे. राज्यात चार हजार ४६६ तलाठी पदांसाठी सुमारे आठ लाख ५६ हजार उमेदवार परीक्षेला बसले होते. ही परीक्षा ३ टप्प्यांत घेण्यात आली होती. त्यानंतर प्रत्येक टप्प्यात घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेची नमुना उत्तरपत्रिका जारी करण्यात आली आहे.
उमेदवारांना उत्तरपत्रिकेबाबत हरकती नोंदविण्याची संधी दिली आहे. येत्या १६ ऑक्टोबरपर्यंत सर्व हरकती एकत्रित करण्यात येणार आहे. मात्र, हरकत नोंदविण्यासाठी (Grievance) १०० रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. लावण्यात आले आहे. एकत्रित केलेल्या हरकती या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या गटाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यात सुधारणा करण्यासाठी ३१ ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम उत्तरपत्रिका जारी करण्यात येईल. त्यानुसार, उमेदवारांना परीक्षेत किती गुण मिळाले हे कळणार आहे,’ असे जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त तथा परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी सांगितले.
(वाचा : Talathi Bharti Exam 2023 Result: आता उत्सुकता तलाठी भरती परीक्षेच्या निकलाची; ‘या’ दिवशी पाहता येणार रिझल्ट)
१५ डिसेंबरला गुणवत्ता यादी :
‘तलाठी परीक्षेच्या निकालाची अंतिम गुणवत्ता यादी १५ डिसेंबरला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसिद्ध केली जाणार आहे. कागदपत्रांच्या पडताळणीसाठी पुढील महिनाभराचा कालावधी देण्यात येणार आहे. त्यानंतर २६ जानेवारीला राज्यपालांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येतील,’ असेही आनंद रायते यांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्ते मिळणार नियुक्ती पत्र :
उमेदवारांनी घेतलेली हरकत योग्य असल्यास त्यानुसार उत्तरपत्रिकेत बदल करण्यात येणार आहे. हरकतीसाठी घेतलेले १०० रुपये शुल्क संबंधित उमेदवाराला परत करण्यात येईल. राज्यपालांच्या हस्ते २६ जानेवारी २०२४ला उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. त्यानंतर फेब्रुवारीत उमेदवारांना नियुक्तीची ठिकाणे निश्चित केली जातील.
– आनंद रायते, अतिरिक्त जमाबंदी आयुक्त
(वाचा : National Testing Agency ने जाहीर केले २०२४ मधील परीक्षांचे वेळापत्रक, यादिवशी होणार CUET, NEET, JEE आणि UGC परीक्षा)