Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘आयसीएसआय’ (ICSI) म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे (Institute of Company Secretaries of India) अध्यक्ष मनीष गुप्ता यांनी नुकतीच याबाबत माहिती दिली. शनिवारी एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, कंपनी सचिव (CS) अभ्यासक्रमात सुधारणा करण्यात आल्या असून, त्याची पहिली परीक्षा येत्या डिसेंबर महिन्यात होणार आहे. तसेच ‘सीएस’ अभ्यासक्रमाची तयारी करणाऱ्या देशभरातील विद्यार्थ्यांसाठी एक डिसेंबरपासून मोफत ऑनलाइन क्लासेस देखील सुरू केले जाणार आहेत.’ असेही ते म्हणाले.
(वाचा: BECIL Recruitment 2023: ‘बेसिल’अंतर्गत आरोग्य क्षेत्रातील विविध पदांसाठी खास भरती! आजच करा अर्ज..)
नवीन कंपनी कायद्याला दहा वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून आयसीएसआयतर्फे आयोजित एका कार्यशाळेसाठी अध्यक्ष मनीष गुप्ता पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बी. नरसिम्हन, पवन चांडक, अमृता नौटियाल, विशाल पाटील, संदीप कुलकर्णी हे संस्थेचे पदाधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
‘सीएस अभ्यासक्रमात सुधारणा करताना कौशल्य विकास, रोजगारक्षमता आणि प्रावीण्यावर भर देण्यात आला असून, कृत्रिम बुद्धिमत्ता, लवाद, कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) असे अनेक नवीन महत्त्वाचे विषय त्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यांचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत विविध विषयांचा लघू कालावधी अभ्यासक्रम करण्यासाठी दोनशेहून अधिक विद्यापीठांशी संस्थेने करार केला आहे. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा हीईल,’ असे प्रतिपादनही यावेळी गुप्ता यांनी केले.
संरक्षण कर्मचारी, अग्निवीरांना शुल्क माफ
‘आयसीएसआय’चा ५५ वा स्थापना दिवस नुकताच साजरा करण्यात आला. या निमित्ताने संरक्षण कर्मचारी, अग्निवीर आणि हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना सीएस अभ्यासक्रमाच्या नोंदणीसाठी शुल्क माफ केले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय हुतात्मा जवानांच्या मुलींच्या शिक्षणासाठी अकरा लाख रुपये संरक्षण मंत्रालयाकडे प्रदान करण्यात आले आहेत,’ असेही या कार्यक्रमात अध्यक्ष मनीष गुप्ता यांनी सांगितले.
(फोटो सौजन्य – ‘आयसीएसआय’चे संकेतस्थळ)
(वाचा: NHM Dhule Bharti 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत धुळे येथे विविध पदांची भरती! चुकूनही चुकवू नका ही संधी..)