Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा देणे बंधनकारक नाही; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा

18

Board Exams Twice a Year Not Mandatory: बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील, असे शिक्षण मंत्रालयाने यापूर्वी जाहीर केले होते. यासह विद्यार्थ्यांना सर्वोत्तम गुण मिळवण्याचा पर्यायही यानिमित्ताने उपलब्ध असणार आहे. मात्र, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा देणे बंधनकारक नसल्याची घोषणा केली आहे.

त्यांनी पीटीआयला सांगितलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा ही संकल्पना मांडण्यात आली आहे. त्यामुळे, बोर्डाची परीक्षा वर्षातून एकदा द्यावी की दोनदा हे ठरवण्याचा अधिकार त्या-त्या विद्यार्थ्यावर असणार आहे.

शिक्षण मंत्रालयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना एका ऐवजी दोन भाषांचा अभ्यास करावा लागणार आहे. “विद्यार्थ्यांना चांगली कामगिरी करण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी मिळावी यासाठी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून किमान दोनदा घेतल्या जातील. विद्यार्थी त्यानंतर त्यांनी पूर्ण केलेल्या आणि तयार असलेल्या विषयांमध्ये बोर्ड परीक्षा देऊ शकतात. त्यांना सर्वोत्कृष्ट स्कोअर राखण्याचीही परवानगी दिली जाईल.” तसेच, इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विषयांची निवड ही कला, विज्ञान आणि वाणिज्य या विषयांपुरती मर्यादित राहणार नाही. त्यामुळे येथेही विद्यार्थ्यांना विषय निवडण्याचे स्वातंत्र्य असेल.

(वाचा : दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा आता वर्षातून दोनदा होणार; तर, ११वी, १२वी मध्ये विषय निवडीचे स्वातंत्र्य)

देशाच्या कोचिंग हब म्हणून ओळख असणार्‍या कोटा येथे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाल्याबद्दल बोलताना मंत्री म्हणाले की, कोणीही आपला जीव गमावू नये आणि कोचिंगची गरज निर्माण होऊ नये यासाठी सरकार पावले उचलत आहे. “कोटामधील विद्यार्थ्यांची आत्महत्या हा एक संवेदनशील मुद्दा आहे, विद्यार्थ्यांना तणावमुक्त ठेवणे ही आमची सामूहिक जबाबदारी आहे,” प्रधान म्हणाले.

शिक्षण मंत्री प्रधान यांनी वृत्तसंस्थेला पुढे सांगितले की परदेशी विद्यापीठांना भारतात त्यांचे कॅम्पस स्थापित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे लवकरच अधिसूचित केली जातील. ते पुढे म्हणाले की, आजच्या शिक्षण व्यवस्थेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाची पुनर्रचना करण्यात येत आहे. २१ व्या शतकातील कामाच्या ठिकाणी भरभराटीस तयार असलेल्या विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्रालय एकत्रितपणे काम करत आहेत.

(वाचा : Maharashtra Talathi Exam 2023: तलाठी परीक्षेच्या निकालाची अंतिम गुणवत्ता यादी १५ डिसेंबरला; २६ जानेवारीला मिळणार नियुक्तीपत्रे)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.