Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने ‘मिशन रोजगार’ हा उपक्रम राबवण्यात आला आहे. याच माध्यमातून ‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’ आयोजित केला आहे. या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. यामध्ये स्कील्ड, अनस्किल्ड आणि सेमी स्किल्ड अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी आहेत. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणार्या कोल्हापूरकरांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
(वाचा: NHM Dhule Bharti 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत धुळे येथे विविध पदांची भरती! चुकूनही चुकवू नका ही संधी..)
या मेळाव्यात आयटी, उत्पादन, हेल्थ केअर, हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोटिव्ह फार्मा, हाउसकिपिंग या आणि अशा अन्य क्षेत्रातील अनेक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात पात्र उमेदवारांची मुलाखती द्वारे निवड केली जाणार आहे. परंतु इच्छुक उमेदवारांना www.missionrojgar.com या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. तसेच नोंदणी केलेल्या इच्छुकांसाठी पूर्व तयारी म्हणून मुलाखतीचे तंत्र, आवश्यक कौशल्ये, बायोडाटा याबद्दल देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ‘ज्ञान आशा’ फाउंडेशन ही संस्था यासाठी सहकार्य करत आहे.
रोजगार मेळाव्याची तारीख: ५ आणि ६ नोव्हेंबर २०२३
रोजगार मेळाव्याचे स्थळ: डी. वाय. पाटील कॅम्पस, साळोखेनगर, कोल्हापूर ४१६००१.
‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेयर २०२३’ मध्ये नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.
किंवा ७२३०९९९५५० या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि नोंदणीसाठीची लिंक मिळवा.
या रोजगार मेळाव्या संदर्भात अधिक माहितीसाठी ९३५६९२८६८६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
(वाचा: NIELIT Recruitment 2023: राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज)