Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

१००-२०० नव्हे तर आता ४३२ मेगापिक्सलच्या कॅमेरा सेन्सरवर काम करत आहे सॅमसंग, लवकरच येऊ शकतो स्मार्टफोनमध्ये

29

सॅमसंग भविष्यात आपल्या फोनमध्ये ४३२ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर सादर करू शकते. सध्या गॅलेक्सी एस२३ अल्ट्रा मध्ये कंपनी २०० मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देत आहे जो स्मार्टफोनमधील सर्वाधिक रिजोल्यूशन असलेला कॅमेरा सेन्सर आहे. आता नवीन रिपोर्टमधून समोर आलं आहे की कंपनी ISOCELL HW1 आणि HW2 ब्रँडिंग अंतगर्त कंपनी दोन ४३२ मेगापिक्सलच्या सेन्सरवर काम करत आहे. हे दोन्ही १-इंचाचे सेन्सर आहेत.

Samsung 432 MP कॅमेरा सेन्सरमध्ये नवीन काय

टिपस्टर रेवेग्नस नुसार, सॅमसंग कथितरित्या ISOCELL HW1 आणि HW2 नावाचा १-इंचाचा मोबाइल इमेज सेन्सर तयार करत आहे. ह्या दोन्हींचा उल्लेख ४३२मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर म्हणून केला गेला आहे.

हे देखील वाचा: Whatsapp Secret Codes फिचर आलं समोर; सोपं होईल ‘हे’ काम, असा करा वापर

असे असू शकतात दोन सेन्सर

ISOCELL HW1: १/१.०५-इंच, ०.५६µm, ४३२-मेगापिक्सल

ISOCELL HW2: १/१.०७-इंच, ०.५µm, ४३२-मेगापिक्सल

जुलै २०२२ मध्ये एक Hexa²Pixel ट्रेडमार्क मिळाला होता, ज्यातून संकेत मिळेल होते की कॅमेरा ३६:१ पिक्सेल बिनिंगचा वापर करू शकतो, जो ४३२ मेगापिक्सल (म्हणजे १२एमपीx३६) इतका आहे. तसेच रेवेग्नस नं आधीच्या एक पोस्टमध्ये असा देखील दावा केला आहे की सुमारे ४४० मेगापिक्सलचा सेन्सर २०२४ च्या उत्तरार्धात मोठ्या प्रमाणात निर्माण केला जाऊ शकतो.

२०२५ च्या सुरुवातीला लाँच होणाऱ्या गॅलेक्सी एस२५ सीरीजमध्ये ४३२ मेगापिक्सलचा सेन्सर येऊ शकतो किंवा २०२६ च्या सुरुवातीला गॅलेक्सी एस२६ सीरीजमध्ये हा येण्याची शक्यता आहे. आशा आहे की हा गॅलेक्सी झेड फोल्ड ६ साठी ISOCELL GN3 चा वापर सुरूच राहील आणि कदाचित गॅलेक्सी झेड फोल्ड ७ साठी ISOCELL S5KHP5 वर स्विच करू शकते.

हे देखील वाचा: फक्त २००० रुपयांच्या मासिक हप्त्यावर मिळवा iPhone 13; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर, असा करा बुकिंग

Samsung Galaxy S24 Ultra मध्ये असू शकतो २००मेगापिक्सलचा कॅमेरा

मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी सध्या सॅमसंग गॅलेक्सी एस२४ अल्ट्रावर काम करत आहे. ह्या आगामी सॅमसंग फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये २००मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेन्सर, ५० मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स आणि १०मेगापिक्सलची पेरिस्कोप लेन्स असेल. तसेच ह्यात फ्रंटला १२ मेगापिक्सलचा सेन्सर असण्याची शक्यता आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.