Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Flipkart Sale: १० हजारांच्या आत उपलब्ध झाले लॅपटॉप; ऑनलाइन क्लासेससाठी आहेत बेस्ट

33

फ्लिपकार्ट सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्स कॅटेगरीवर जबरदस्त डील्स मिळत आहेत. ह्या सेलमध्ये काही लॅपटॉप स्मार्टफोन पेक्षा देखील स्वस्तात मिळत आहेत. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये १० हजार रुपयांच्या आत देखील नवीन लॅपटॉप विकत घेता येतील, जे फीचर्स आणि परफॉर्मन्सच्या जोरावर दैनंदिन कामं सहज करू शकतील. हे फीचर लोडेड लॅपटॉप आहेत.

Primebook Wifi MT8183

ह्या लॅपटॉपची किंमत १८,९९९ रुपये आहे, परंतु फ्लिपकार्टवर फक्त ८,९९० रुपयांमध्ये विक्रीसाठी सादर करण्यात आला आहे. हा एक ११.६ इंचाचा लॅपटॉप आहे, ज्याचे वजन १ किलोग्रॅम आहे. लॅपटॉप रॉयल ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये येतो. ह्यात प्राइम ओएसचा सपोर्ट देण्यात आला आहे, जी एक अँड्रॉइड आधारित ऑपरेटिंग सिस्टम आहे. त्यामुळे ह्या लॅपटॉपमध्ये तुम्ही तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनमधील अ‍ॅप देखील सहज वापरू शकता.

हे देखील वाचा: वनप्लसला टक्कर येण्यासाठी येतेय iQOO 12 सीरीज; जबरदस्त फीचर्सची माहिती लीक

ह्यात मीडियाटेक ८१८२ चा वापर करण्यात आला आहे, जो अँड्रॉइड ११ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. लॅपटॉप ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज ऑप्शनमध्ये येतो. तसेच बँक डिस्काउंट ऑफरमध्ये खरेदी केल्यास १० टक्के डिस्काउंटसह १५०० रुपयांपर्यंतची सूट मिळवता येईल. त्यामुळे ह्या डिवाइसची किंमत ७ हजारांच्या देखील खाली जाईल. तसेच लॅपटॉप १,४९९ रुपयांच्या मासिक ईएमआय ऑप्शनवर विकत घेता येईल. लॅपटॉपच्या खरेदीवर ८,२०० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.

हे देखील वाचा: Oppo चा सर्वात स्वस्त 5G Phone आला बाजारात; कमी किंमतीतही ८जीबी रॅम आणि ९० हर्ट्झचा डिस्प्ले

ASUS Chromebook Celeron Dual Core N4020

ह्या लॅपटॉपची किंमत २४,९९० रुपये आहे. हा फ्लिपकार्टवरून १०,९९० रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. लॅपटॉपच्या खरेदीवर १०,२०० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. त्याचबरोबर बँक डिस्काउंट स्वरूपात १५०० रुपयांपर्यंतची सूट मिळवता येईल. लॅपटॉपमध्ये ११.६ इंचाचा एचडी एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा क्रोमओएसवर चालतो, त्यामुळे विंडोज अ‍ॅप्लिकेशन ह्यावर वापरता येणार नाहीत. त्यामुळे ऑनलाइन क्लाससाठी किंवा मीडिया डिवाइस म्हणून देखील ह्याचा वापर करता येईल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.