Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

परीक्षांचे बिगूल वाजले, विद्यार्थ्यांनो तयारीला लागा; पुणे विद्यापीठाचे परीक्षांचे विस्कळीत वेळापत्रक रूळावर

8

Pune University Exam Timetable: पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सत्र परीक्षांना नोव्हेंबर महिन्याच्या अखेरिस सुरूवात होणार असून, विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय, विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचेही नियोजनही अशाच पद्धतीने करण्यात आले आहे. त्यामुळे, पुणे विद्यापीठाचे विस्कळीत झालेले शैक्षणिक वर्षाचे आणि परीक्षांचे वेळापत्रक आता रूळावर आले आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे पुणे विद्यापीठ आणि त्या अंतर्गत येणार्‍या महाविद्यालयांच्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. साधारणपणे एक सत्र उशिराने हे वेळापत्रक लांबल्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी अचडणी निर्माण झाल्या होत्या. परीक्षा वेळेत न झाल्याने, परीक्षांच्या निकालाचेही बारा वाजले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असूनही ती वेळेत पूर्ण करता आली नाही.

(वाचा : CAT 2023 Updates: यंदा कॅट २०२३, २६ नोव्हेंबरला; २५ ऑक्टोबरपासून ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध)

यावर्षी मात्र, इंजिनीअरिंग, एमबीए, एमसीए अशा व्यावसायिक, तर बीए, बीकॉम, बीएस्सी अशा बिगर व्यावसायिक पारंपरिक अभ्यासक्रमाची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया वेळेत झाली आहे. शिवाय, द्वितीय, तृतीय किंवा अंतिम वर्षांचे सत्रही ऑगस्ट महिन्यातच सुरू झाले आहे. त्यामुळे विद्यापीठाने सत्र परीक्षा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरिस सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यातच विद्यापीठाच्या वेबसाइटवरुण परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. विद्यार्थ्यांना आणखी काही दिवस अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. साधारण डिसेंबर महिन्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा संपवण्याचे नियोजन परीक्षा आणि मूल्यमापान मंडळाचे नियोजन असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही..

  • लॉ प्रथम वर्ष (First Year Law) अभ्यासक्रमाच्या परीक्षा सप्टेंबर महिन्याच्या अखेरिस संपल्या. या परीक्षेचा निकाल अजूनही जाहीर झालेला नाही. मात्र, द्वितीय वर्षाच्या परीक्षांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. प्रथम वर्षाच्या परीक्षेचा निकालच जाहीर झाला नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरतांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
  • प्रथम वर्षाचे बॅकलॉग विषय असतील, तर त्यांचा अर्ज कसा भरावा किंवा या विषयांचा पुन्हा अर्ज भरण्याची संधी मिळणार का..? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
  • दरम्यान याबाबत मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांना विचारले असता, प्रथम वर्षांच्या निकालांबाबत महाविद्यालयांकडून माहिती घेण्यात येईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल असे सांगण्यात आले.

(वाचा : Maharashtra Talathi Exam 2023: तलाठी परीक्षेच्या निकालाची अंतिम गुणवत्ता यादी १५ डिसेंबरला; २६ जानेवारीला मिळणार नियुक्तीपत्रे)

वेळेत परीक्षा, वेळेत निकाल…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षा हा ९० दिवसांचे अध्यापन झाल्यानंतरच घेण्यात येत आहे. सत्र परीक्षा वेळेत घेऊन, निकालही वेळेत जाहीर करण्यावर भर राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षांच्या तयारीला सुरूवात करावी.
– डॉ. महेश काकडे (संचालक, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ)

(वाचा : NET Exam 2024: यूजीसीची घोषणा, यंदाची ‘नेट’ परीक्षा ६ ते २२ डिसेंबरला; अशी असेल अर्ज प्रक्रिया)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.