Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गोळीगत फास्ट चार्ज होतात हे स्मार्टफोन; किंमत २९,९९९ रुपयांपासून सुरु

11

सध्या स्मार्टफोनची सवय इतकी झाली आहे की फोन हातात नसेल तर लोक कावरेबावरे होतात. त्यामुळे जेव्हा स्मार्टफोन चार्जिंगला असतो तेव्हा १ ते २ तास वाट पाहणं सर्वांना आवडत नाही. म्हणून बाजारात फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या स्मार्टफोनची मागणी वाढत आहे. तुम्हाला माहिती आहे की बाजारात काही असे स्मार्टफोन आहेत जे फक्त काही मिनिटांत ० ते १०० टक्के चार्ज होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच स्मार्टफोन्स बद्दल सांगणार आहोत ज्यांच्या समावेश भारतातील सर्वात वेगानं चार्ज होणाऱ्या फोन्समध्ये होतो.

Xiaomi 11T Pro

  • चार्जिंग स्पीड – १२०वॉट
  • चार्जिंग टाइम – ० ते १०० टक्के चार्ज होण्यास १७ मिनिटे
  • किंमत – २९,९९९ रुपये

हा फोन स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेटसह १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ६.६७ इंच अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात आला आहे. ह्यात १०८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि एक टेली मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. हा फोन ५००० एमएएचच्या बॅटरीसह लाँच करण्यात आला आहे.

हे देखील वाचा: यापेक्षा स्वस्तात मिळणार शक्तिशाली OnePlus 11 5G, ७ हजारांची सूट आणि OnePlus Buds Z2 मोफत

iQOO 9 Pro

  • चार्जिंग स्पीड – १२० वॉट
  • चार्जिंग टाइम – १ ते १०० टक्के पर्यंत चार्ज होण्यासाठी सुमारे २० मिनिटे
  • किंमत – ६४,९९० रुपये

फोनमध्ये ६.७८ इंचाचा २के ई५ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ८ जेन १ चिपसेटला सपोर्ट करतो. ह्याचा प्रायमरी सेन्सर ५० मेगापिक्सलचा आहे. त्याचबरोबर ५० मेगापिक्सलचा सेकंडरी आणि १६ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट सेन्सर देण्यात आला आहे. फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. फोन ४७०० एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: इतकी असू शकते दोन डिस्प्ले असलेल्या Oppo Find N3 Flip ची किंमत; उद्या येतोय भारतात

OnePlus 10 Pro

  • चार्जिंग स्पीड – – ८०वॉट फास्ट चार्जिंग
  • चार्जिंग टाइम – ० ते ५० टक्के चार्ज होण्यास १२ मिनिटे, तर पूर्ण १०० टक्के चार्ज होण्यास ३२ मिनिटे
  • किंमत – ६६,९९९ रुपये

हा फोन ६.७ इंचाच्या क्यूएचडी+ १२०हर्ट्झ फ्ल्यूड अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात आला आहे. कंपनीनं ह्यात स्नॅपड्रॅगन ८ जेन १ चिपसेटचा वापर केला आहे. फोटोग्राफीसाठी ४८ मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा मिळतो. तर फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. ह्यात ५००० एमएएचची बॅटरी मिळते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.