Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Redmi K70 फोन ९०वॉट फास्ट चार्जिंगसह येईल बाजारात; सर्टिफिकेशन साइटवर दिसला फोन

20

Redmi K70 सीरीजची वाट अनेक रेडमी प्रेमी पाहत आहेत, कारण ही ब्रँडची फ्लॅगशिप सीरिज आहे. ही सीरिज कमी किंमतीत शक्तिशाली प्रोसेसरसह येऊ शकते. कंपनी ही सीरिज डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाँच करू शकते. लाँच पूर्वीच ह्या सीरीजचे फोन अनेक सर्टिफिकेशन साइटवर स्पॉट झाले आहेत. लेटेस्ट लीक रिपोर्टनुसार, रेडमी के७० सीरीज चीनच्या ३सी सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट झाला आहे. ह्या लिस्टिंगच्या माध्यमातून फोनच्या अनेक फीचर्सची माहिती समोर आली आहे.

Redmi K70 स्मार्टफोन मॉडेल नंबर 2311DRK48C सह चीनी सर्टिफिकेशन साइट 3C वर लिस्ट झाला आहे. ह्या लिस्टिंगमधून माहिती मिळाली आहे की सीरीजचा हा फोन ५जी नेटवर्क सपोर्टसह बाजारात येईल. फोनमध्ये ९० वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळेल.

हे देखील वाचा: गोळीगत फास्ट चार्ज होतात हे स्मार्टफोन; किंमत २९,९९९ रुपयांपासून सुरु

जुन्या लीक्सनुसार, रेडमी के७० सीरीजमध्ये कंपनी तीन स्मार्टफोन्स मॉडेल्स सादर करू शकते. या सीरीजमध्ये Redmi K70, Redmi K70e आणि Redmi K70 Pro स्मार्टफोनचा समावेश केला जाईल. रेडमी के७० प्रो सीरीजचा प्रीमियम डिवाइस असेल, जो काही दिवसांपूर्वी गीकबेंचवर स्पॉट दिसला आहे. लीक्सनुसार, फोन Android 14 आधारित MIUI 15 वर चालेल.

Redmi K70 Pro गीकबेंच लिस्टिंग

Redmi K70 Pro फोन मॉडेल नंबर 23117RK66C सह गीकबेंचवर दिसला होता. गीकबेंच साइटवर फोनचा सिंगल कोर स्कोर ११०० होता तर मल्टी कोर स्कोर ५१५० होता. लिस्टिंग मधून समजलं होतं की हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह येईल, त्याचबरोबर कंपनी १६जीबी रॅम देऊ शकते.

हे देखील वाचा: आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली OnePlus येतोय; पावरफुल स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ चिपसेटसह येईल बाजारात

फोनमध्ये २के डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ असेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा OIS सपोर्टसह मिळू शकतो. तसेच, फोनची बॅटरी ५,५००एमएएच असेल जी १२०वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

https://www.youtube.com/watch?v=Bi-J3GTknjM

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.