Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
OnePlus Pad GO ची किंमत
OnePlus Pad GO चे अनेक व्हेरिएंट भारतात आले आहेत. ह्यातील वायफाय कनेक्टिव्हिटी आणि १२८ जीबी स्टोरेज असलेला मॉडेल १९,९९९ रुपयांना मिळेल. तर एलटीई व्हेरिएंटची किंमत २१,९९९ रुपयांपासून सुरु होते. तर एलटीई २५६जीबी मॉडेलची किंमत २३,९९९ रुपये आहे. हा आज दुपारी १२ वाजल्यापासून प्री-ऑर्डर करता येईल. तर २० ऑक्टोबरपासून फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि वनप्लस वेबसाइटच्या माध्यमातून विक्री सुरु होईल.
हे देखील वाचा: १३ हजारांच्या आत आला Samsung चा नवा टॅबलेट; Galaxy Tab A9 सीरीजचे दोन मॉडेल भारतात लाँच
ऑफर्स पाहता, ICICI, OneCard, SBI, ICICI, Kotak आणि Axis बँक कार्डच्या माध्यमातून टॅबवर २००० रुपयांचा डिस्काउंट मिळेल. तर प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना १,३९९ रुपयांचा OnePlus Pad Go Folio Cover अगदी मोफत मिळेल.
OnePlus Pad Go Specs
ह्या टॅबमध्ये ११.३५ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, जो २४०८ x १७२० पिक्सल रिजोल्यूशन, ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ४०० निट्झ पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. कंपनीनं टॅबमध्ये मीडियाटेक हेलीयो जी९९ चिपसेटचा वापर केला आहे. सोबत ८जीबी एलपीडीडीआर४एक्स रॅम आणि २५६जीबी यूएफएस २.२ स्टोरेज देण्यात आली आहे.
हे देखील वाचा: Flipkart Sale: १० हजारांच्या आत उपलब्ध झाले लॅपटॉप; ऑनलाइन क्लासेससाठी आहेत बेस्ट
फोटोग्राफीसाठी कंपनीनं ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे, जो इलेक्ट्रॉनिक मॅजिक स्टेबिलायजेशनला सपोर्ट करतो. तर सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी ह्यात ८ मेगापिक्सलचा सेन्सर मिळतो. OnePlus Pad GO टॅबमध्ये ८०००एमएएचची बॅटरी आहे, जी ३३वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर ऑडियोसाठी या टॅबमध्ये क्वॉड स्पिकर्स देण्यात आले आहेत, जे डॉल्बी अॅटमॉसला सपोर्ट करतात. तर कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, ब्लूटूथ व यूएसबी चार्जिंग सपोर्ट मिळतो.