Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
JioBharat B1 ची किंमत
जिओच्या अधिकृत वेबसाइटनुसार, जियोभारत बी१ सीरीजची किंमत १२९९ रुपये आहे. हा जिओचा एक स्वस्त ४जी फोन आहे, ज्यात २.४ इंचाची स्क्रीन आणि २००० एमएएचची बॅटरी मिळते, ज्यामुळे हा थोड्या चांगल्या सेगमेंटमध्ये येतो. नवीन JioBharat B1 फोन जुन्या मॉडेलच्या तुलनेत मोठी स्क्रीन आणि बॅटरी कपॅसिटी देतो. ह्याव्यतिरिक्त इतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. प्रोडक्ट इमेजवरून समजलं आहे की फोनमध्ये एक कॅमेरा परंतु कॅमेरा स्पेसिफिकेशनची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
हे देखील वाचा: ओप्पो-विवो नव्हे तर ‘हा’ आहे जगातील बेस्ट सेल्फी कॅमेरा फोन; DxOMark रँकिंगमध्ये नंबर वन
फोनमध्ये जिओ अॅप्स असतील प्री इंस्टॉल
जुन्या मॉडेल्स प्रमाणे ह्या फोनमध्ये देखील जिओ अॅप्स आधीच इंस्टॉल केलेलं असतील. त्यामुळे ह्या फिचर फोनवर देखील युजर्स मूव्ही, व्हिडीओ आणि स्पोर्ट्स हाइलाइट्स इत्यादींचा लाभ घेऊ शकतील. नवीन फोन २३ भारतीय भाषांना सपोर्ट करतो. ह्यात UPI पेमेंटसाठी JioPay अॅप देखील मिळेल.
हे देखील वाचा: Redmi K70 फोन ९०वॉट फास्ट चार्जिंगसह येईल बाजारात; सर्टिफिकेशन साइटवर दिसला फोन
वेबसाइटनुसार, जिओच्या प्रीइंस्टॉल्ड अॅप्स फोनसह मिळतील आणि जियोभारत फोनमध्ये नॉन-जिओ सिम कार्डचा वापर करता येणार नाही. सध्या JioBharat B1 फोन फक्त ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. एकंदरीत JioBharat B1 सीरीज एक बेसिक ४जी फोन आहे ज्यात जुन्या मॉडेलच्या तुलनेत थोडी मोठी स्क्रीन आणि बॅटरी आहे. अधिक सविस्तर स्पेसिफिकेशन्स कंपनी लवकरच शेअर करू शकते, ते मिळताच ही बातमी अपडेट केली जाईल.