Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आज जरी इस्राइलमध्ये युद्धजन्य परिस्थिति असली तरी यापूर्वी आणि आजही इस्राइलमध्ये नोकरीसाठी जाणार्या भारतीयांचे प्रमाणात सर्वाधिक आहे. IT (Information Technology) किंवा डेटा सायन्स (Data Science) क्षेत्रात नव्हे तर एका वेगळ्याच कामासाठी भारतीयांना खूप मोठी मागणी आहे. या कामाच्या मोबदल्यात भारतीयांना भरघोस पगारही दिला जातो. इस्राइलमध्ये ‘केअरगिव्हर’ (Caregiver) चे काम करणार्या भारतीयांना विशेष मागणी असून, पगारसह त्यांना इतर भत्तेही दिले जातात.
(वाचा : Foreign Education: परदेशी शिक्षणाचे पर्याय अनेक; तुमचा परदेशी शिक्षणाचा मार्ग निवडण्यासाठी परिपूर्ण माहिती)
‘केअरगिव्हर’ म्हणजे काय…?
सध्या सर्वत्र अधुंनिकताली आहे. मात्र, या आधुनिकतेमुळे माणसा-माणसामधील माणूसपण हरवत चालले आहे. परिणामी त्यांच्याकडे कुटुंबाला देण्यासाठी वेळ उरत नाही. अमेरिका, जपान या देशांसह इस्राइलमध्येही अशीच परिस्थिति आहे. इस्राइलमध्ये सध्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडे वेळ नाही.
इथल्या लोकांकडे पैसे आहेत पण वेळ नाही. त्यामुळे या लोकांना त्यांच्या घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सेवा शुश्रूषेसाठी नर्सेसची गरज भासते. त्यामुळे त्यांच्या घरातील ज्येष्ठांना (सीनियर Citizen) सांभाळण्यासाठी तेथे भारतीय लोकांची मागणी वाढत आहे. त्यांना हे ‘केअरगिव्हर’ त्यांच्या घरातील ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी हवे असतात.
‘केअरगिव्हरवर’ ही जबाबदारी :
एका सर्वेक्षणानुसार, गेल्या काही वर्षात इस्राइलमध्ये जेष्ठ नागरिकांची संख्या खूप वाढली आहे. युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक कमिशन फॉर युरोपच्या मते इस्राइलमध्ये साल १९५० नंतर ६५ वर्षावरील नागरिकांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे, इथल्या घरामधील वृध्द व्यक्तींच्या देखभालीसाठी इस्राइल कुटुंबे ‘केअरगिव्हर’ नेमणूक करत आहेत. यात भारतीय ‘केअरगिव्हर’ना जास्त मागणी आहे. भारतीयांमधील संयम आणि व्यावसायिक कौशल्य गुणांमुळे ते भारतीय लोकांना पहिली पसंती देतात. सध्या येथे १४ हजार भारतीय हेच काम करीत आहेत.
Caregiver ला मिळतो इतका पगार :
इस्राइलमध्ये इंडीयन केअरगिव्हरना खूप मागणी आहे. त्यांना येथे सव्वा लाख ते तीन लाखापर्यंत पगार देण्यात येतो. येथे प्रत्येक तासाला किमान ९०० रु.पगार दिला जातो. शिवाय, हे काम करणार्या व्यक्तींना राहण्याचा, खाण्याचा आणि वैद्यकीय खर्चही खर्च वेगळा दिला जातो. येथे केवळ शुक्रवार दुपार ते शनिवार दुपारपर्यंत सुटी मिळते. इतर देशांसाठी केअर गिव्हरसाठी नर्सिंगमध्ये ग्रॅज्युएशन आवश्यक असते. परंतू, भारतीयांना यामध्ये सूट आहे. येथे त्यांना संवादासाठी केवळ हिब्रु भाषा शिकविण्यात येते. इतर देशात कोणत्याही देशात काम करण्यासाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि संवाद कौशल्य असणे गरजेचे आसते. मात्र, Israel मध्ये या कामासाठी इंग्रजी भाषेची सक्ती नाही. केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक भारतीय येथे नोकरीला आहेत.
(वाचा : Top 12 Skillful Career Courses: कौशल्यपूर्ण करिअर वाटांचा पर्याय तुमच्यासाठी खास; या कोर्सेसनंतर करिअर विकासाच्या हटके संधी)