Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

iPhone 15 Pro Max पेक्षा मजबूत आहे Google Pixel 8 Pro; पाहा ड्युरेबलीटी टेस्टचा व्हिडीओ

10

Google चा नवा पिक्सल फोन जुन्या मॉडेलच्या तुलनेत बराच महाग आहे, कंपनीनं हार्डवेअर अपग्रेड केला आहे आणि सॉफ्टवेअर फिचर देखील भरपूर दिले आहेत. Google Pixel 8 Pro ची ड्युरेबिलिटी टेस्टिंग लोकप्रिय युट्युबर जॅक उर्फ JerryRigEverything नं केली आहे. ह्या टेस्टमध्ये नव्या पिक्सलनं सर्वात शक्तिशाली आयफोन पेक्षा चांगली कामगिरी केली आहे. चला पाहूया पिक्सेल ८ प्रोची ड्युरेबिलिटी टेस्ट.

Google Pixel 8 Pro नं बिनदिक्कत पास केली बेंड टेस्ट

गुगल पिक्सल ८ प्रो मध्ये ६.७ इंचाचा एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो २००० निट्झच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. ह्या डिस्प्लेवर इतर फ्लॅगशिप अँड्रॉइड स्मार्टफोन प्रमाणे गोरिल्ला ग्लास विक्टस २ ची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे इतर डिवाइस प्रमाणे पिक्सलनं स्क्रॅच टेस्टमध्ये कामगिरी केली. तुम्ही पुढील व्हिडीओमध्ये पाहू शकता.

हे देखील वाचा: India vs Pakistan मॅचच्या निमीत्ताने Sansui ची मोठी घोषणा, भारत जिंकल्यास ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही मोफत

ह्या फोनमध्ये आयफोन १५ प्रो सीरिज प्रमाणे मजबूत टायटेनियम फ्रेम देण्यात आलेली नाही, ह्यात मेटल फ्रेम मिळते जी डिसेंट ड्युरेबिलिटी देते. जॅकच्या टेस्टमध्ये आयफोन १५ प्रो मॅक्सची बेंड टेस्ट करताना फोनवर दबाव टाकताच बॅक ग्लास फुटली. परंतु गुगल पिक्सल ८ प्रोमध्ये मात्र असं काहीही झालं नाही. फोन टेस्टमध्ये थोडा आवाज करत होता पण ह्या व्यतिरिक्त फोनल काही झालं नाही.

हे देखील वाचा: रेडमी-रियलमी टक्कर देईल का स्वस्त Samsung Galaxy A05s? १८ ऑक्टोबरला येतोय भारतात

जर तुम्ही पिक्सल ८ प्रो घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आता डिवाइसच्या बिल्ड क्वॉलिटीची काळजी करण्याची गरज नाही. तसेच पिक्सल ६ आणि पिक्सल ७ प्रमाणाने ह्या नव्या सीरीजमध्ये कर्व्ह डिस्प्ले नाही. त्यामुळे हा फोन क्रॅक झाला नसावा. गुगल पिक्सल ८ ची किंमत भारतात ७५,९९९ रुपयांपासून सुरु होते तर पिक्सल ८ प्रोसाठी १०,०६९९९ रुपये मोजावे लागतील.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.